शहरात आज तीन ठिकाणी मोफत ‘आरटीपीसीआर’ चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST2021-07-07T04:31:55+5:302021-07-07T04:31:55+5:30

‘कोल्हापूर चेंबर’ संलग्न रेडिमेड गारमेंट असोसिएशनतर्फे दुपारी बारा ते दोन यावेळेत ‘कोल्हापूर चेंबर’मधील शिवाजीराव देसाई सभागृहात कॅॅम्प होईल. ...

Free RTPCR test at three locations in the city today | शहरात आज तीन ठिकाणी मोफत ‘आरटीपीसीआर’ चाचणी

शहरात आज तीन ठिकाणी मोफत ‘आरटीपीसीआर’ चाचणी

‘कोल्हापूर चेंबर’ संलग्न रेडिमेड गारमेंट असोसिएशनतर्फे दुपारी बारा ते दोन यावेळेत ‘कोल्हापूर चेंबर’मधील शिवाजीराव देसाई सभागृहात कॅॅम्प होईल. सकाळी दहा ते दुपारी दोन यावेळेत कोल्हापूर टिंबर व्यापारी व लघू औद्योगिक संघ व कोल्हापूर प्लायवुड असोसिएशनतर्फे टिंबर व्यापारी असोसिएशनच्या हॉलमध्ये आणि शिवाजी मार्केट व्यापारी असोसिएशन, फुटवेअर असोसिएशन आणि

पानलाइन

असोसिएशन व इतर संघटनांतर्फे शिवाजी मार्केटमधील परवाना विभाग परिसरात कॅॅम्प होणार आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी होऊन व्यापार सुरळीत होण्याच्या उद्देशाने हे कॅम्प आयोजित केले आहेत. त्याचा सर्व व्यापारी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘कोल्हापूर चेंबर’ तर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Free RTPCR test at three locations in the city today