शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

चार संशयित खलाशी ताब्यात

By admin | Updated: August 22, 2014 00:55 IST

१३ खलाशांची चौकशी : बेकायदा सिमकार्डचा वापर केल्याचा ठपका

रत्नागिरी : मच्छिमारी नौकांवर काम करणाऱ्या अनेक परदेशी खलाशांकडून बेकायदा मोबाईल सिमकार्ड वापराचे गंभीर प्रकरण स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने उघडकीस आणले आहे. आज, गुरुवारी दुपारी मिरकरवाडा बंदरात छापा टाकून १३ जणांना ताब्यात घेण्यात आले. कागदपत्र तपासणीत चौघेजण संशयित सापडल्याने त्यांना पुढील चौकशीसाठी गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले. चौकशी झालेल्या एकाचा गुन्हा शाबित झाल्याने त्याच्यासह मोबाईल व सिमकार्ड विक्रेत्याला ताब्यात घेऊन दोघांवर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात मच्छिमारी नौकांवर खलाशी म्हणून काम करणारे अनेक खलाशी बेकायदेशीर मोबाईल सिमकार्ड वापरत असून त्यांच्याकडे ओळख पटविणारी आवश्यक कागदपत्रेही नसल्याची माहिती गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली. त्यावरून आज, गुरुवारी दुपारी पोलिसांनी मिरकरवाडा बंदर जेटीजवळ छापा टाकला. त्यात १३ जणांना ताब्यात घेतले. त्यांतील नऊजणांकडे योग्य कागदपत्रे मिळाल्याने त्यांना सोडूून देण्यात आले. ताब्यात घेतलेल्या चारपैकी दलबहादूर रामफल चौधरी (४०, नेपाळ, सध्या रा. मिरकरवाडा जेटी, रत्नागिरी) याच्या चौकशीत त्याच्याकडे बोगस ओळखपत्र सापडले. तसेच त्याच्याकडे बेकायदा मोबाईल सिमकार्डही आढळून आले. त्यासाठी त्याने विके्रत्याकडे कोणतीही कागदपत्रे सादर केली नव्हती. हे सिमकार्ड त्याने नाटे बाजारपेठेतील विक्रेता दर्शन सुहास कुवेसकर याच्याकडून घेतले आहे. मात्र दर्शन कुवेसकर याच्याकडे सिमकार्ड व मोबाईल विक्रीचा कोणताही परवाना नाही, अशी माहिती लगेचच पुढे आली. त्याने बेकायदा कोणतीही कागदपत्रे न घेता हा व्यवहार केल्याने त्यालाही नाटे येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या प्रकरणातील आणखी तीन संशयितांची चौकशी सुरू असून त्यांच्याकडील सिम, ओळखपत्रप्रकरणी तपास सुरू आहे, अशी माहिती गुन्हा अन्वेषण विभागाकडून देण्यात आली. गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाई करणाऱ्या पथकात उपनिरीक्षक कोळी, पोलीस नाईक सुनील पवार, संदीप काशीद, प्रवीण बर्गे, जमीर पटेल, राजू गमरे, आदी पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)देशाच्या सुरक्षेला धोका!मच्छिमारी नौकांवर याप्रकारे बेकायदा सिमकार्ड वापर करणाऱ्यांकडून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे याबाबतची तपासणी मोहीम सुरूच राहणार असून, दोषी आढळणाऱ्या खलाशांवर व संबंधित नौकांविरोधातही गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील यांनी दिली.