‘शरद’च्या चार विद्यार्थ्यांची ‘इन्फोसिस’मध्ये निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:30 IST2021-09-10T04:30:22+5:302021-09-10T04:30:22+5:30

यामध्ये मेकॅनिकल विभागाच्या महेश कोळेकर, संकेत किणेकर, इलेक्ट्रिकलच्या निकीता शिंदे व कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या वैभव कदम या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ...

Four students of 'Sharad' selected in 'Infosys' | ‘शरद’च्या चार विद्यार्थ्यांची ‘इन्फोसिस’मध्ये निवड

‘शरद’च्या चार विद्यार्थ्यांची ‘इन्फोसिस’मध्ये निवड

यामध्ये मेकॅनिकल विभागाच्या महेश कोळेकर, संकेत किणेकर, इलेक्ट्रिकलच्या निकीता शिंदे व कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या वैभव कदम या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ॲप्टीट्युड ट्रेनिंग, टेक्ऩिकल स्कीलचे वेगळे प्रशिक्षण, तसेच मॉक इंटरव्ह्यू यासह टेक्निकल सेशन, व्हॅल्यू ॲडेड प्रोग्रॅम, कंपनी स्पेसोपिक ट्रेनिंग, अद्यावत तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील व इंडस्ट्री क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबविले जातात. त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना या कॅम्पससाठी झाल्याची माहीती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने दिली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. प्राचार्य बी. एस. ताशीलदार, ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे प्रा. अभिजित केकरे, प्रा. नेहा सोनी यांच्यासह सर्व डीन, विभागप्रमुख यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Four students of 'Sharad' selected in 'Infosys'