शहरं
Join us  
Trending Stories
1
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
4
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
5
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
6
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
7
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
8
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
9
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
10
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
11
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
12
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
13
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
14
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
15
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
16
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
17
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
18
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
19
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
20
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘गडहिंग्लज’च्या स्वाती कोरी जाणार भाजपमध्ये; महाराष्ट्रातील एकमेव आणि शेवटचा बालेकिल्ला असणाऱ्या जनता दलाचे अस्तित्व संपणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 14:00 IST

रविवारी प्रवेश : चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, शिवाजीराव पाटील यांची उपस्थिती

राम मगदूम

गडहिंग्लज : जनता दलाचे माजी आमदार दिवंगत ॲड. श्रीपतराव शिंदे यांची कन्या, गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील यांची उपस्थिती राहणार असल्याचे समजते.

रविवारी (दि. २५) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ आणि प्रा.कोरी यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने भाजपकडून शक्तिप्रदर्शनाची शक्यता आहे. येथील सूर्या सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम होणार आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी नुकतीच जनता दलाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी प्राप्त परिस्थितीत करावा लागणारा संघर्ष विचारात घेऊन प्रा.कोरींनी थेट भाजपमध्ये प्रवेश करावा,असा आग्रह बहुतेक कार्यकर्त्यांनी धरला. त्यामुळे संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेऊया, असे त्यांनी सांगितले होते. त्याच वेळी त्यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत मिळाले.

दरम्यान, त्यांनी आपल्या पक्षातील वडिलधाऱ्यांसह संबंधित सर्वांशी विचारविनिमय केला. त्यानंतर मंत्री पाटील,आमदार पाटील यांच्याशीही चर्चा केली.भाजप प्रवेशानंतर प्रा.कोरी यांच्यासह कार्यकर्त्यांना ताकद देण्याची ग्वाही दिल्यामुळेच त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे समजते.

प्रा.कोरी यांची राजकीय वाटचाल

२००६ मध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीतून राजकारणाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर दोनवेळा नगराध्यक्षपद भूषवले. दरम्यान, गडहिंग्लज कारखान्याच्या संचालिका म्हणूनही काम पाहिले. १५ वर्षे गडहिंग्लज कुक्कुटपालन सहकारी संस्थेच्या अध्यक्षा आणि श्रीपतराव शिंदे शिक्षणसमूहाच्या सचिव म्हणून काम पाहत आहेत.

‘जद’चे अस्तित्व संपणार!

जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी भाजपसोबत युती केली तरी पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहिलेले ॲड. शिंदे हे अखेरपर्यंत समाजवादी विचारांशी एकनिष्ठ राहिले. मात्र,त्यांच्या कन्या प्रा. कोरींनी केवळ अपरिहार्यता म्हणूनच भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जनता दलाचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे. किंबहुना, महाराष्ट्रातील एकमेव आणि शेवटचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडहिंग्लजची ओळखही इतिहासजमा होणार आहे.

केवळ औपचारिकता बाकी!

बुधवारी(२१) निवडणुकीचे अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी जनता दलाच्या तीन कार्यकर्त्यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे प्रा. कोरी यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले असून, केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Swati Kore joins BJP, Janata Dal's bastion collapses.

Web Summary : Swati Kore, daughter of ex-MLA Shripatrao Shinde, is joining BJP. This move threatens the existence of the Janata Dal in Kolhapur, its last stronghold in Maharashtra. Her entry follows worker pressure and promises of support from BJP leaders.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५BJPभाजपा