कोल्हापूर जिल्ह्यातील जेष्ठ क्रीडा संघटक, कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन, कोल्हापूर ( के एस ए )चे माजी अध्यक्ष व कार्यकारणी सदस्य श्री सरदार मोमीन यांचे आज गुरुवार दिनांक 9 सप्टेंबर 2021 रोजी पहाटे कोल्हापूरात सोमवार पेठेतील निधन झाले. ते ८७ वर्षाचे होते.
सरदार मोमीन हे अविवाहित होते.त्यांच्या मागे पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. उत्कृष्ट बँडमिटन व टेनिसपटू असलेले सरदार मोमीन यांनी गेल्या ६ दशकाहून अधिक काळ क्रीडा संघटनेत वाहून घेतले होते. त्यांनी केएसएच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले होते.