कोल्हापूर : पोलीस दलातून सक्तीने सेवानिवृत्तीच्या केलेल्या कारवाईविरोधात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे अपील दाखल केले आहे, हे अपील न्यायाकरिता प्रलंबित आहे. असे पत्रक सेवानिवृत्त पोलीस हवालदार अजिज रमजान शेख यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
कार्यालयीन कामकाजाच्या अनुषंगाने चौकशी अर्ज प्रलंबित ठेवणे, गुन्ह्यांचा तपास सीसीटीएनएसमध्ये नोंद न करणे असा ठपका ठेवून ही कारवाई केली आहे. यात लाचेचा कोणताही आरोप माझ्यावर केला नसल्याचेही शेख यांनी पत्रकात म्हटले आहे.
यात म्हटले आहे की, माझ्यावर ठेवलेल्या आरोपाबाबत विभागीय चौकशी झाली. पण तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची कोणतीही शहानिशा न करता चुकीचा अहवाल सादर केला. त्यामुळे आपल्यावर पोलीस अधीक्षकांमार्फत सक्तीने सेवानिवृत्तीची कारवाई केली आहे. झालेल्या या अन्यायाबाबत दाद मागण्यासाठी मी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे अपील दाखल केले आहे.