अकरानंतर दुकाने सुरू ठेवण्याऱ्यांना ३० हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:24 IST2021-04-23T04:24:55+5:302021-04-23T04:24:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : शहरामध्ये अकरानंतर दुकाने सुरू ठेवणाऱ्या दोन बीअर बार, पाच हॉटेल व्यावसायिक व इलेक्ट्रीकचे गोडावून ...

A fine of Rs 30,000 for running shops after 11 p.m. | अकरानंतर दुकाने सुरू ठेवण्याऱ्यांना ३० हजारांचा दंड

अकरानंतर दुकाने सुरू ठेवण्याऱ्यांना ३० हजारांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : शहरामध्ये अकरानंतर दुकाने सुरू ठेवणाऱ्या दोन बीअर बार, पाच हॉटेल व्यावसायिक व इलेक्ट्रीकचे गोडावून सुरू ठेवणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई करून ३० हजार रुपयांचा दंड केला. शहरामध्ये विनामास्क, सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याने १४९ नागरिक व व्यापाऱ्यांकडून ७६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

शहरामध्ये शासनाच्या आदेशानुसार अकरानंतर औषधे दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत. मिरजकर तिकटी येथील रविराज बीअर बार, संभाजीनगर येथील इंदिरासागर बीअर बार यांना प्रत्येकी पाच हजार रुपये, तर पितळी गणपती येथील तीन हॉटेलवर प्रत्येकी एक हजार रुपये असे एकूण १५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. यासोबतच पद्मा टॉकीजजवळील आर. के. लाईट हाऊस यांनी गोडावून सुरू ठेवून गोडावूनमधून इलेक्ट्रीक माल विकल्याबद्दल त्यांच्याकडून १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस पथकाकडून १४९ लोकांकडून ७६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. नागरिक त्याचे तंतोतंत पालन करीत नाहीत याबद्दल केएमटी आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाकडून विनामास्क १४६ लोकांकडून ७०००, सोशल डिस्टन्सचे पालन न केल्याने तीनजणांकडून तीन हजार रुपये असे एकूण ७६ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

Web Title: A fine of Rs 30,000 for running shops after 11 p.m.