शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेसाठी इच्छुकांची फिल्डिंग

By admin | Updated: February 20, 2015 23:11 IST

गडहिंग्लज तालुका : उमेदवारीसाठी ‘राष्ट्रवादी’त रस्सीखेच

राम मगदूम - गडहिंग्लज -जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. तालुक्यातील एकूण १०७ सेवा संस्था बँकेच्या मतदार आहेत. त्यापैकी अधिकाधिक ठराव मिळविण्यासाठी इच्छुकांत चढाओढ झाली असली तरी ‘राष्ट्रवादी’मध्येच उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच आहे.गेल्यावेळी राष्ट्रवादीतर्फे सेवा संस्था गटातून टी. आर. पाटील व दूध संस्था गटातून भैयासाहेब कुपेकर यांना, तर महिला प्रतिनिधी म्हणून ऊर्मिलादेवी शिंदे यांना सत्ताधारी आघाडीतून संधी मिळाली होती.थकीत कर्ज वसुलीच्या कारणावरून विद्यमान संचालकांवर निवडणूक लढविण्यासाठी अपात्रतेच्या गंडांतराचे संकट आले आहे. त्यामुळे त्यांच्या जागी यावेळी त्यांच्या वारसांची नावे चर्चेत आहेत. ठरावांच्या जमवाजमवीवरून त्यास पुष्टी मिळाली आहे.गडहिंग्लज तालुक्यातील बहुतांशी सेवा संस्थांवर राष्ट्रवादीचेच वर्चस्व असल्यामुळे ठराव गोळा करण्यात राष्ट्रवादीनेच बाजी मारली आहे. मात्र, इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे उमेदवार देताना पक्षनेतृत्वाची कसोटी लागणार आहे.याशिवाय अप्पी पाटील, संग्रामसिंह कुपेकर, श्रीपतराव शिंदे, प्रकाश चव्हाण, प्रकाश शहापूरकर व सदानंद हत्तरकी यांच्या गटातर्फेही ठराव गोळा करण्याची ‘विशेष’ मोहीम राबविण्यात आली आहे. तथापि, बँकेच्या निवडणुकीत जिल्हा पातळीवरील आघाड्या व पॅनेलची रचना कशी होणार? यावरच उमेदवारीची संधी कुणाला मिळणार, हे स्पष्ट होणार आहे.स्व. कुपेकर यांच्या जिल्ह्याच्या राजकारणातील दबदब्यामुळे यापूर्वी राष्ट्रवादीला तालुक्यात दोन जागा मिळत होत्या. आघाडीतील मित्रपक्ष म्हणून जनता दलाचे नेते अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांच्या पत्नी ऊर्मिलादेवी यांनाही दोनवेळा संचालकपदाची संधी मिळाली. कुपेकरांच्या पश्चात होणाऱ्या या निवडणुकीत गडहिंग्लजसह जिल्ह्याच्या राजकारणाचेही संदर्भ बदलले आहेत. त्यामुळे तालुक्याला किती जागा मिळणार? यासाठी वाट पाहावी लागणार आहे.राष्ट्रवादीतर्फे विद्यमान संचालक टी. आर. पाटील यांचे सुपुत्र संतोष पाटील-कडलगेकर, सतीश पाटील-गिजवणेकर, राजेश पाटील-औरनाळकर, जिल्हा परिषद सदस्य शिवप्रसाद तेली व जयकुमार मुन्नोळी यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, उमेदवारीचा अंतिम निर्णय संध्यादेवी कुपेकर यांच्यावरच अवलंबून आहे.स्व. बाबासाहेब कुपेकर यांचे बंधू भैयासाहेब कुपेकर यांना गेल्यावेळी दूध संस्था गटातून उमेदवारी मिळाली होती. मात्र, त्यांचे सुपुत्र संग्रामसिंह कुपेकरांनी विधानसभा निवडणुकीत संध्यादेवींच्या विरोधात बंडखोरी केली. त्यामुळे दूध संस्था गटाची उमेदवारी अन्य तालुक्याला गेल्यास गडहिंग्लजला मिळणाऱ्या एका जागेसाठी राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच होईल.यावेळी बँकेच्या निवडणुकीला विधानसभा निवडणुकीचे संदर्भ असणार आहेत. त्यामुळे अप्पी पाटील व संग्रामसिंह कुपेकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.