शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘घोसाळकर नानां’चे वैफल्यातून खोटे आरोप

By admin | Updated: December 5, 2014 00:46 IST

राजेश क्षीरसागर : बदनामीचा दावा ठोकणार

कोल्हापूर : कोल्हापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेने दिलेला पराभवाचा दणका नगरसेवक सत्यजित कदम यांच्या जिव्हारी लागला आहे. खिलाडूवृत्तीने पराभव पचविण्यापेक्षा कुरघोडीचे राजकारण करीत माझ्या बदनामीचा डाव कदम यांनी आखला आहे. वैफल्यातून हे ‘घोसाळकर नाना’ खोटे आरोप करीत आहेत. त्यामुळे कदम यांच्यावर पाच कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज, गुरुवारी पत्रकाद्वारे दिला. पोलिसांकडून गुन्ह्यांबाबत मिळालेल्या लेखी माहितीच्या आधारेच निवडणूक आयोगास प्रतिज्ञापत्रात माहिती दिल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी या निवेदनात दिले.आमदार क्षीरसागर यांनी आॅक्टोबर २०१४ मध्ये राज्य निवडणूक विभागास सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील गुन्हे व त्यांचा तपशील याची अपूर्ण माहिती दिली. पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे व प्रतिज्ञापत्राद्वारे दिलेली माहिती यामध्ये तफावत आहे. क्षीरसागर यांनी १५ गुन्ह्यांची माहिती लपविल्याने त्यांची निवड रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी कदम यांनी काल, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. याबाबत स्पष्टीकरण करताना क्षीरसागर यांनी पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांची सही असलेल्या पत्राधारे मिळालेल्या माहितीद्वारेच निवडणूक आयोगास प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे सांगितले. पोलिसांच्या पत्राच्या आधारेच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याची माहिती न घेताच आरोप करणाऱ्या बालिश बुद्धीच्या कदम यांनी पोलिसांच्या पत्राची तरी नोंद घ्यावी, असा घणाघातही क्षीरसागर यांनी केला.प्रतिष्ठेसाठी आमदार होऊ पाहणाऱ्या कदम यांनी निवडणुकीस उभारण्यापूर्वी चुकीच्या पद्धतीने व पैशाने मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला. कदम यांनी निवडणुकीत कोट्यवधी रुपये खर्चूनही करवीरच्या स्वाभिमानी जनतेने मला २२ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून दिले व मतदारांनी कदम यांना त्यांची जागा दाखविली. सर्वसामान्यांच्या हितासाठी नेहमी आंदोलकाची भूमिका घेतल्यानेच गेल्या पाच वर्षांत माझ्यावर ५५ गुन्हे नोंद झाले आहेत. हे सर्व गुन्हे कॉँग्रेस व राष्ट्रवादीने लादले आहेत. माझ्यावरील गुन्ह्यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व करवीरच्या जनतेला अभिमान आहे, याची कदम यांनी नोंद घ्यावी, असा सल्लाही क्षीरसागर यांनी दिला.निवडणूक प्रचारादरम्यान प्रॉपर्टी, मठ-तालीम, आदी बिनबुडाचे आरोप बगलबच्च्यांमार्फ त करून सत्यजित कदम यांनी माझी नाहक बदनामी केली. विनाकारण बदनामी करणाऱ्या या ‘घोसाळकर नाना’ व त्यांच्या बगलबच्च्यांवर लवकरच पाच कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे. - राजेश क्षीरसागर, आमदार