शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आॅफलाईन

By admin | Updated: July 12, 2014 00:42 IST

राजेंद्र दर्डा यांचा निर्णय : रसाळे यांची माहिती

कोल्हापूर : राज्यातील खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांतील अतिरिक्त ठरलेल्या पण, समायोजन न झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन आॅफलाईन काढण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी पत्रकाद्वारे दिली.पटसंख्येचे निकष पूर्ण न झाल्याने राज्यातील खासगी प्राथमिक शाळांमधील हजारो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले होते. पण, शासनाकडून त्यांचे समायोजन झाले नसल्याने व शालार्थ वेतनप्रणालीमध्ये अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्याची सुविधा नसल्याने गेल्या काही महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आले नव्हते. वेतन नसल्याने या कर्मचाऱ्यांची आर्थिक कुचंबणा होत असल्याने संघटनेतर्फे राज्यात धरणे, हलगीनाद आंदोलन करण्यात आले. तसेच शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, आयुक्त चोकलिंगम, सचिव अश्विनी भिडे व शिक्षण संचालक महावीर माने यांची भेट घेऊन अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी तत्त्वत: मागणी मान्य केली. त्यानंतर मुंबईत आज, शुक्रवारी शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी शिक्षण विभागाचे आयुक्त, सचिव आणि शिक्षण संचालक यांची बैठक घेतली. यात त्यांनी संबंधित अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुढील तीन महिने वेतन आॅफलाईनपणे काढण्याच्या सूचना मंत्री दर्डा यांनी दिल्या. या निर्णयामुळे राज्यातील खासगी प्राथमिक शाळांतील ३ हजार ५०० आणि २ हजार ६०० शिक्षकेतर कर्मचारी अशा एकूण ६ हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षक कर्मचाऱ्यांचे समायोजनही करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालक माने यांनी सांगितले आहे. आॅफलाईन वेतन अदा करण्याच्या निर्णयाचे संघटनेतर्फे स्वागत करत असून या निर्णयाबद्दल मंत्री दर्डा यांचे अभिनंदन केल्याचे रसाळे यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)