जयंतीच्या पूर्वसंध्येला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:22 IST2021-04-14T04:22:44+5:302021-04-14T04:22:44+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे जयंतीच्या पूर्वसंध्येलाच पावसाच्या धारा अंगावर झेलतच बिंदू चौकातील ...

On the eve of the anniversary, Dr. Greetings to Babasaheb Ambedkar | जयंतीच्या पूर्वसंध्येला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

जयंतीच्या पूर्वसंध्येला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीतर्फे जयंतीच्या पूर्वसंध्येलाच पावसाच्या धारा अंगावर झेलतच बिंदू चौकातील पुतळ्याला पालकमंत्र्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीतर्फे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर जयंती साजरी होते; पण गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे जयंती रद्द झाली. यावर्षीही कोरोनामुळे भव्य प्रमाणात जयंती साजरी करण्यावर निर्बंध आले आहेत. आज, बुधवारी जयंती साजरी होत असली तरी आदल्या दिवशीच अभिवादनाच्या कार्यक्रमाचे नियोजन समितीतर्फे करण्यात आले होते. संध्याकाळी पाऊस सुरू झाल्याने कार्यक्रमाविषयी साशंकता व्यक्त होत होती; पण आंबेडकरी अनुयायांनी पावसाची पर्वा न करता संध्याकाळी बिंदू चौक गाठले. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. आंबेडकर यांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Web Title: On the eve of the anniversary, Dr. Greetings to Babasaheb Ambedkar