शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळमध्ये पूरग्रस्तांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:30 IST

शिरोळ : शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या प्रश्नांसाठी पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्यावतीने मंगळवारी आक्रमक भूमिका घेतली. ४३ गावांतील पूरग्रस्तांनी तहसील कार्यालयावर ...

शिरोळ : शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या प्रश्नांसाठी पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्यावतीने मंगळवारी आक्रमक भूमिका घेतली. ४३ गावांतील पूरग्रस्तांनी तहसील कार्यालयावर पावसात भव्य मोर्चा काढून संताप व्यक्त केला. पूरग्रस्तांना अद्याप मदत मिळाली नसल्याने राज्य शासनाचा निषेध यावेळी करण्यात आला. मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा हा लढा सुरू राहणार असल्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.

महापुराबाबत शासनाकडून कोणतेच नियोजन झाले नसल्याने तसेच पूरग्रस्तांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नसल्याच्या निषेधार्थ पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्यावतीने मंगळवारी मोर्चाचे आयोजन केले होते. या पार्श्वभूमीवर शिवाजी तख्त येथून मोर्चाला सुरुवात झाली. तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, अण्णासाहेब चौगुले, सुनील इनामदार, सुरेश सासणे, अ‍ॅड. सुशांत पाटील, दशरथ काळे, डॉ. संजय पाटील, रामचंद्र डांगे आदींनी मनोगत व्यक्त करून तीव्र भावना व्यक्त केल्या. मागण्यांचे निवेदन तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांना देण्यात आले. निवेदन स्वीकारुन तहसीलदार डॉ. मोरे म्हणाल्या, पहिल्या टप्प्यात २७ गावांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. या गावचे सानुग्रह अनुदान वाटपाचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. उर्वरित गावांच्या पंचनाम्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांचेही अनुदान लवकरच दिले जाईल.

मोर्चात विश्वास बालीघाटे, डॉ. संजय पाटील, सुनील इनामदार, अ‍ॅड. सुशांत पाटील, दगडू माने यांच्यासह मोठ्या संख्येने पूरग्रस्त सहभागी झाले होते.

-

चौकट - पूरग्रस्तांच्या मागण्या

शिरोळ तालुक्यात महापूर येऊ नये यासाठी गावनिहाय कृती आराखडा तयार करावा, पूर व महापूर नियंत्रण रेषा आखावी, कृष्णा, पंचगंगा, वारणा व दुधगंगा या नदीवरील धरणातील पाणीसाठा व विसर्गाबाबत नियोजन करावे, कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांतील समन्वयासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेऊन अधिकारी व स्थानिक समितीची नियुक्ती करावी, शेतीपंप व साहित्यांची शंभर टक्के नुकसानभरपाई द्यावी, यासह तीस मागण्या यावेळी करण्यात आल्या.

फोटो - १७०८२०२१-जेएवाय-०२,०३

फोटो ओळ - शिरोळ येथे पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्यावतीने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.