शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात हत्तींचे पुनरागमन, बागायती केल्या फस्त

By admin | Updated: November 3, 2016 14:56 IST

काही दिवस गायब असलेले वन्य हत्ती पुन्हा एकदा हेवाळे-बांबर्डे गावात दाखल झाले असून त्यांनी भात पिकाची उडवी व कापणी केलेले भातपिक फस्त केले.

ऑनलाइन लोकमत
दोडामार्ग (जि.सिंधुदुर्ग), दि. ३ -  गेले काही दिवस गायब असलेले वन्य  हत्ती पुन्हा एकदा हेवाळे-बांबर्डे गावात दाखल झाले असून त्यांनी भात पिकाची उडवी व  कापणी केलेले भातपिक फस्त केले. ऐन भातपिक ताब्यात घेणेच्या वेळेलाच वन्य हत्ती पुन्हा दाखल झाल्याने बळीराजाच्या उरात प्रचंड धडकी भरली असून संपूर्ण हेवाळे, बाबरवाडी, घाटवाडी, बांबर्डे  येथील शेतकरी कमालीचे हवालदिल झाले आहेत. 
बऱ्याच दिवसानंतर पुन्हा दाखल झालेल्या हत्तीच्या कळपाने भात पिकाबरोबरच केळी, सुपारी, माड बागतीचेही अतोनात नुकसान केले आहे.  वनखात्याकडे सातत्याने पाठपुरावा करूनही सिंधुदुर्गचे  पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार विनायक राऊत यांचे सातत्याने लक्ष वेधूनही गेले वर्षभर हेवाळे बाबरवाडी परिसरात नुकसानी करणाऱ्या हत्तींचा बंदोबस्त अद्याप झालेला नाही. परिणामी नुकसान सत्र कायम असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे हत्तींचा बंदोबस्त करण्यात खासदार , पालकमंत्री उदासीन त्यामुळेच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान सरपंच संदीप देसाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 
 दरम्यान बांबर्डे व घाटीवडे येथील शेतकरी गोविंद बाबली गवस यांचे भात व केळी , विठ्ठल राणे यांची भात उडवी , अश्विनी आबासाहेब देसाई यांचे भात, वसंत सखाराम देसाई यांची केळी, विठ्ठल दत्ताराम देसाई केळी व सुपारी, भीमराव राणे यांच्या केळी व भातपिक , सिद्धेश राणे यांच्या केळी बागायतीचे नुकसान केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगढ तालुक्यातून गेल गॅस पाईप लाईनसाठी काढलेल्या मार्गाने बुधवारी रात्रौ २ च्या सुमारास २ हत्ती खाली उतरले. व त्यांनी बांबर्डे व घाटीवडे येथिल शेतकऱ्यांचे शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणात  नुकसान केले. गेले पंधरा दिवस हत्तींची जाग माग नसल्याने येथील शेतकरी निर्धास्त होते. मात्र बुधवारी रात्रौ दाखल झालेल्या हत्तींनी केलेलं नुकसान पाहता शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. दरम्यान  वनपाल  दत्ताराम देसाई यांनी वनरक्षक मुकाडे, लोकरे व वनमजूर  देसाई यांच्या समवेत नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला आहे. तर रात्रौ आलेले हत्ती आल्यामार्गाने पुन्हा माघारी परतल्याचा दावा केला आहे. मात्र खबरदारी म्हणून आज सायंकाळी ६ वाजलेपासून आपली हत्ती प्रतिबंधक टीम बांबर्डे येथे ठेवणार असल्याची माहिती वनपाल देसाई यांनी दिली आहे.
 
शेतकऱ्यांना वाली कोण?
पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार विनायक राऊत यांनी दिलेल्या आश्वासनामुळे आमच्या हेवाळे गावावरील हत्ती संकट टळेल अशी आशा निर्माण झाली होती. १ जुलैला पालकमंत्री केसरकर यांनी स्वतः आमच्या हत्तीबाधित गावाची पाहणी करून हत्ती बंदोबस्त साठी ठोस उपाययोजना करू असे आश्वासन दिले होते. त्यामुळे निश्चित हा प्रश्न मार्गी लागेल असे वाटत होते. मात्र अद्याप तशा कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नसल्याने किंबहुना त्या प्रस्तावित नसल्याने आमच्या शेतकऱ्यांना कोणी वाली नाही अशी आमची भावना आता नाईलाजास्तव निर्माण झाली आहे. मात्र रात्रंदिवस अतोनात मेहनत करणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी व त्यांना या संकटांतून सोडविण्यासाठो आपला लोकशाही मार्गाने लढा सुरूच राहील अशी प्रतिक्रिया दिली.