शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

नाकाबंदीवेळी पोलिसांना मोपेडमध्ये सापडला २५५ ग्रॅम गांजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:55 IST

कोल्हापूर : अवैधरित्या गांजा हा अमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी तरुणास अटक केली, तर त्याच्या एका साथीदारावरही ...

कोल्हापूर : अवैधरित्या गांजा हा अमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी तरुणास अटक केली, तर त्याच्या एका साथीदारावरही गुन्हा नोंदवला. चिन्मय अरुण वेलणेकर (वय १९, रा. सातपुते गल्ली, हत्ती चौक, इचलकरंजी) असे अटक केलेल्या संशयिताचे, तर तुषार राजू साळुंखे (रा. व्यंकटराव हायस्कूल, इचलकरंजी) असे गुन्हा दाखल झालेल्या साथीदाराचे नाव आहे.

बुधवारी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलिसांच्यावतीने संभाजीनगर परिसरात नाकाबंदीवेळी वाहनांची तपासणी सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला.

कारवाईत पोलिसांनी संशयितांकडून तीन हजार रुपये किमतीचा २५५ ग्रॅम गांजा, ७५ हजाराची दुचाकी व १० हजाराचा मोबाईल असा सुमारे ८८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या सूचनेनुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी बुधवारी रात्री संभाजीनगर परिसरात नाकाबंदी करून पोलीस पथकामार्फत वाहनांची तपासणी केली. त्याचवेळी एका संशयिताच्या मोपेडची तपासणी सुरू असताना त्या मोपेडच्या डिक्कीत सुमारे तीन हजार रुपये किमतीच्या २५५ ग्रॅम गांजाची पुडी सापडली. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडील मोपेड, मोबाईल असा सुमारे ८८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

त्याची अधिक चौकशी केली असता, हा गांजा त्याचा साथीदार तुषार साळुंखे याने आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघाही संशयितांवर गुंगीकारक औषधी द्रव्य व मोनोव्यापारावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियमअन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तुषार साळुंखे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तो मिळाला नाही.