शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेतून दूध संस्थांना दहा हजार मिळणार

By admin | Updated: December 29, 2016 01:18 IST

‘गोकुळ’शी संलग्न संस्थांना दिलासा : आतापर्यंत १२० कोटी जिल्हा बँकेत, तर १०७ कोटी इतर बँकांत अडकले

कोल्हापूर : ‘गोकुळ’शी संलग्न प्राथमिक दूध संस्थांना जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या माध्यमातून प्रत्येकी दहा हजार रुपये रोकड देण्यात येणार आहे. यूथ बॅँकेच्या माध्यमातून रोखीने पैसे देण्याचा प्रयत्न संघाने केला; पण त्याला संस्थांचा प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हा बँकेच्या माध्यमातून पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ‘गोकुळ’ दूध संघाचे जिल्हा बँकेत १२० कोटी, तर इतर बँकांत १०७ कोटी अडकले आहेत. दूध संस्थांची कोट्यवधीची बिले अडकल्याने कोंडी निर्माण झाली आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी संघाच्यावतीने विविध मार्गांचा अवलंब केला जात आहे. ‘गोकुळ’ दुधाच्या रोख विक्रीतून जमा होणाऱ्या पैशातून संस्थांना बिलापोटी काही रक्कम देण्याचा निर्णय घेतला होता. यूथ डेव्हलपमेंट बँकेतून ही रक्कम संस्थांना देण्याची तयारी केली. दूध संकलनाच्या प्रमाणात पैसे उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला होता. परंतु, दूध संस्थांकडून त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. स्थानिक पातळीवर त्यांना बिलाचे पैसे मिळावेत, अशी मागणी झाल्याने जिल्हा बॅँकेच्या शाखांमार्फत पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘गोकुळ’ दूध विक्रीतून जमा होणारी रक्कम जिल्हा बॅँकेत जमा करायची आहे. त्यातून सरासरी प्रत्येक संस्थेला दहा हजार रुपये दिले जाणार असून, २० हजारांपर्यंत रक्कम काढता येणार आहे. ज्या संस्थांचे संकलन जास्त आहे, त्यांना आठवड्यातून दोनवेळा पैसे काढण्याची मुभा दिली जाणार असून, जिल्हा बॅँकेने त्या प्रमाणात रक्कम देण्याचे मान्य केले आहे. तीन लाखांचा लागेना मेळकोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (केडीसीसी) नोटाबंदीनंतर जमा झालेल्या रकमांमध्ये दोन लाख ९८ हजार रुपयांच्या नोटांचा मेळ लागत नसल्याचे समजते. त्यामुळे मुख्यालयातून फोन करून शाखांना पैसे भरण्याचा आग्रह केला जात आहे.पंतप्रधानांनी ८ नोव्हेंबरला ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर पुढील तीन दिवसांत जिल्हा बँकेत २५५ कोटी रुपये जमा झाले. या नोटा शाखांतून जमा झाल्यावर त्या मोजून घेऊनच मुख्यालयात आणण्यात आल्या. आता मुख्यालयात या सर्व नोटा मोजल्यानंतर त्यामध्ये दोन लाख ९८ हजार रुपयांच्या नोटा कमी पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रत्येक शाखेला फोन करून किती नोटा दिल्या, याची छाननी केली जात आहे. आम्ही मुख्यालयाकडून कॅश घेतली आणि त्यात नंतर कमी रक्कम आली तर मुख्यालय आमची तक्रार ऐकून घेत नाही आणि आता मात्र पैसे मोजून देऊनही तुम्ही दहा-दहा हजार रुपये भरा, असा तगादा लावला जात असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.दरम्यान, सांगली जिल्हा बँकेची ‘आयकर’ व ‘ईडी’कडून चौकशी झाल्यामुळे कोल्हापूर बँकेचे व्यवस्थापनही हादरले आहे. अशी चौकशी झाल्यास बँकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लागतो व सभासदांतही संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे सत्ताधारी आणि अधिकारीही चिंतेत आहेत.रोखीने अ‍ॅडव्हान्स रक्कम वाटपास संस्थांचा प्रतिसाद मिळाला नाही. जिल्हा बॅँकेशी चर्चा करून प्रत्येक संस्थेला पैसे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. - विश्वास पाटील (अध्यक्ष, गोकुळ) अशी मिळू शकते रक्कमप्रतिदिनी संकलनदहा दिवसालालिटरमध्येमिळणारी रक्कम १ ते ५०७ हजार ५१ ते १००९ हजार१०१ ते १५०११ हजार १५१ ते २००१२ हजार२०१ ते २५०१३ हजार२५१ ते ३००१४ हजार३०१ ते ३५०१५ हजार ३५१ ते ४००१६ हजार४०१ ते ४५०१७ हजार४५१ ते ५००१८ हजार५०१ ते ६००१९ हजार६०१ ते ७००२० हजारपेक्षा जास्त आठवड्यातून दोनवेळा