शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

आंबेवाडी गावचा सीटी सर्व्हे करण्याची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 12:29 IST

Collcator Kolhapur-आंबेवाडी (ता. करवीर) गावचा सीटी सर्व्हे करण्यास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अनुकूलता दर्शवत लवकरच कार्यवाही करू, असे सांगितले. सरपंच सिकंदर मुजावर व उपसरपंच तेजस सुतार यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी देसाई यांनी हे आश्वासन दिले.

ठळक मुद्देआंबेवाडी गावचा सीटी सर्व्हे करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : आंबेवाडी (ता. करवीर) गावचा सीटी सर्व्हे करण्यास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अनुकूलता दर्शवत लवकरच कार्यवाही करू, असे सांगितले. सरपंच सिकंदर मुजावर व उपसरपंच तेजस सुतार यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी देसाई यांनी हे आश्वासन दिले.आंबेवाडी चार हजार लोकवस्तीचे हे गाव पंचगंगा नदीला व कोल्हापूर शहराला लागून आहे. शंभर टक्के पूरग्रस्त असलेल्या या गावाचे सीटी सर्व्हे झालेले नसल्यामळे बांधकाम, व्यवसाय व तत्सम बाबींना कर्ज देण्याबाबत लोकांना अडचणींना सामना करावा लागत आहे.

उतारा नसल्याने बँका कर्जच देत नसल्याने शहरापासून अवघ्या एक किलोमीटर या हाकेच्या अंतरावर असताना देखील कोणत्याही सुधारणा गावात करता येत नाहीत. त्यामुळे हे उतारे द्यावेत आणि रखडलेला विकास मार्गी लावावा, अशी मागणी सातत्याने होत होती.

ग्रामस्थांनी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील यांच्यामार्फत यासंदर्भात निवेदन दिले होते. यावर मंत्री जयंत पाटील यांनीही हे उतारे देण्यास जिल्हाधिकाऱ्यांना सांगू, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार गुरुवारी झालेल्या बैठकीत मंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनीही लगेच कार्यवाही करावी, अशी विनंती सरंपचांनी केली. यावर देसाई यांनी कार्यवाही करू, असे आश्वस्त केले. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर