शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

कबनूरच्या जमिनी वर्ग १ करण्याबाबत १५ दिवसांत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कबनूर : येथील जमिनी वर्ग एक करण्याबाबत महसूल विभागाने पंधरा दिवसांत निर्णय घ्यावा, अशी सूचना ग्रामविकासमंत्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कबनूर : येथील जमिनी वर्ग एक करण्याबाबत महसूल विभागाने पंधरा दिवसांत निर्णय घ्यावा, अशी सूचना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात मौजे कबनूर गावच्या जमिनी वर्ग १ करण्याबाबत बैठक बोलावली होती. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी किशोर पवार, अप्पर तहसीलदार शरद पाटील यांच्यासमक्ष पंचगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.एम. पाटील, माजी जि.प. सदस्य जयकुमार कोले, अशोक पाटील यांनी प्रास्तावित विषयाची माहिती दिली.

कबनूर गाव इचलकरंजी औद्योगिकनगरीजवळ असल्यामुळे गावामध्ये येणारे उद्योजक तसेच कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आपले व्यवसाय तसेच कामगार वर्ग निवासासाठी जमीन खरेदी करत आहेत. त्यांना सदर जमिनी इनामी असून याबाबत नजराणा रक्कम शासनाकडे जमा करण्याचा सल्ला दिला जातो. नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. सात/बारावर भोगवटादार वर्ग १ नोंद असूनही भोगवटादार वर्ग २ होण्यासाठी नियमानुसार नजराणा रक्कम भरावी लागते. त्यामुळे अनेक व्यवहार अपूर्ण आहेत याचा भुर्दंड सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.

इचलकरंजीचे प्रांताधिकारी व हातकणंगलेच्या तहसीलदारांनी या प्रकरणाची माहिती घेऊन हे प्रकरण आपल्याकडे पाठवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी भोगवटदार १ करण्यात येऊन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी मंत्री मुश्रीफ व प्रभारी जिल्हाधिकारी पवार यांच्याकडे केली. पंधरा दिवसांत महसूल विभागाने कबनूर जमिनी वर्ग १ करण्याबाबत निर्णय घ्यावा अशी सूचना केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या विजया पाटील, सरपंच शोभा पोवार, उपसरपंच सुधीर पाटील, पंचगंगेचे संचालक प्रमोद पाटील, बी.डी. पाटील, सुधाकर झोले, महावीर लिगाडे, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, आदी उपस्थित होते.