शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढ प्रस्तावचा निर्णय घ्या : कृती समिती संघर्ष इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 12:16 IST

Muncipalty Kolhapur- कोल्हापूर महापालिका प्रशासनाने हद्दवाढीबाबतचा प्रस्ताव पाठविण्याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा. अन्यथा महापालिकेशी संघर्ष अटळ आहे. दहा दिवसांनंतर निर्णय झाला नाही तर महापालिकेच्या कामकाजात अडथळा आणू, असा इशारा सर्वपक्षीय हद्दवाढ समर्थक कृती समितीचे निमंत्रक माजी महापौर आर. के. पोवार यांनी दिला आहे. हद्दवाढीसंदर्भातील आंदोलनाची पुढील दिशाबाबत विचारले असता त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.

ठळक मुद्देहद्दवाढ प्रस्तावचा निर्णय घ्या : कृती समिती संघर्ष इशारा महापालिकेच्या कामकाजात अडथळा आणणार

कोल्हापूर : महापालिका प्रशासनाने हद्दवाढीबाबतचा प्रस्ताव पाठविण्याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा. अन्यथा महापालिकेशी संघर्ष अटळ आहे. दहा दिवसांनंतर निर्णय झाला नाही तर महापालिकेच्या कामकाजात अडथळा आणू, असा इशारा सर्वपक्षीय हद्दवाढ समर्थक कृती समितीचे निमंत्रक माजी महापौर आर. के. पोवार यांनी दिला आहे. हद्दवाढीसंदर्भातील आंदोलनाची पुढील दिशाबाबत विचारले असता त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी हद्दवाढीबाबत फेरप्रस्ताव पाठविण्याची सूचना केली आहे. मात्र, महापालिकेची मुदत संपली असल्यास निवडणूक होत नाही तोपर्यंत तेथील क्षेत्र बदल करता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे आहेत.

प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी याचा दाखला देत कायदेशीर बाबी तपासून पुढील निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. हद्दवाढ समर्थक कृती समितीच्यावतीने यासंदर्भात १० दिवसांत महापालिकेने स्पष्टोक्ती करावे, असे म्हटले आहे.प्रशासक डॉ. बलकवडे यांची १० दिवसांनी भेट घेऊन प्रस्ताव पाठविण्याबाबत पुन्हा मागणी केली जाईल, तरीही प्रस्ताव पाठविला गेला नाही तर मात्र, आरपारची लढाई सुरू करावी लागेल. यामध्ये मोर्चा, रास्ता रोको, उपोषण करणार नसून महापालिकेच्या कामात अडथळा आणला जाईल, असे आंदोलन केले जाईल, असे आर. के. पोवार यांनी सांगितले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर