डी. वाय. पाटील विद्यापीठाला ऊर्जा साठवणुकीसाठी पेटंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:27 IST2021-08-27T04:27:03+5:302021-08-27T04:27:03+5:30

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ऊर्जा साठवण्यासाठीच्या ‘रिड्यूस्ड ग्राफीन ऑक्साईड - कॉपर सेलेनाइड’च्या संशोधन पद्धदतीला पेटंट मिळाले आहे. ...

D. Y. Patent for energy storage to Patil University | डी. वाय. पाटील विद्यापीठाला ऊर्जा साठवणुकीसाठी पेटंट

डी. वाय. पाटील विद्यापीठाला ऊर्जा साठवणुकीसाठी पेटंट

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला ऊर्जा साठवण्यासाठीच्या ‘रिड्यूस्ड ग्राफीन ऑक्साईड - कॉपर सेलेनाइड’च्या संशोधन पद्धदतीला पेटंट मिळाले आहे. रिसर्च डायरेक्टर सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधित आणि प्रमाणित केलेल्या या पद्धतीसाठी २०१९ मध्ये संशोधकांनी पेटंट मिळवण्याबाबत अर्ज केला होता. या शोधाअंतर्गत प्रमाणित केलेली नावीन्यपूर्ण ऊर्जा साठवण पद्धती पुढील २० वर्षासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नावे पेटंट स्वरूपात संरक्षित केली जाणार आहे.

यासंदर्भात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी सांगितले, विद्यापीठाच्या अंतर्गत निर्गमित झालेले हे दुसरे पेटंट आहे. विद्यापीठ आणि संशोधकांच्या दृष्टीने ही बाब आनंददायी आहे. जुलै महिन्यात डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या पहिल्या पेटंटला मान्यता मिळाली होती.”

मुख्य संशोधक प्रो. सी. डी. लोखंडे यांनी सांगितले, ‘‘सदर शोध पद्धतीद्वारे तयार केलेल्या ‘थिन फिल्म्स’ ऊर्जा साठवणुकीसाठी बनवले जाणारे विद्युत घटक तसेच सुपर कपॅसिटरमध्ये अत्यंत प्रभावी व कार्यक्षम आहेत.’’

फोटो : २६ डॉ. सी. डी. लोखंडे, धनाजी मालवेकर, डॉ. वैभव लोखंडे

Web Title: D. Y. Patent for energy storage to Patil University