शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

गणनेद्वारे दुर्मीळ वृक्षांचे होणार संगोपन

By admin | Updated: February 20, 2015 23:15 IST

इचलकरंजी शहर परिसर : जीपीएसद्वारे होणार वृक्षगणना

इचलकरंजी : इचलकरंजी शहर हद्दीतील वृक्षांची गणना जीपीएसद्वारे करण्याचा निर्णय नगरपालिका घेत असून, त्याद्वारे दुर्मीळ वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. वृक्ष गणनेमध्ये चार फुटांपेक्षा अधिक उंचीच्या वृक्षांचा समावेश होणार आहे.नगरपालिकेच्या हद्दीत सात वर्षांपूर्वी झालेल्या वृक्ष गणनेत सार्वजनिक जागांमध्ये अठरा हजार वृक्ष आढळून आले होते. त्या वृक्षांमध्ये ६१ प्रकार मिळाले होते. त्यापैकी १८ प्रकारचे वृक्ष विविध फळांचे आहेत. साधारणत: १०० वर्षांपूर्वीची काही झाडे ९० फूट उंचीपर्यंत वाढलेली माहिती मिळाली होती. तसेच काही वृक्षांवर वेलीही आहेत.जीपीएसद्वारे वृक्षगणना केल्यामुळे दुर्मीळ असलेल्या झाडांचा शोध लागणार आहे. हे वृक्ष असलेली ठिकाणे लक्षात आल्यानंतर त्यांचे संगोपन करणे सुलभ होणार आहे. त्याचबरोबर अशा वृक्षांच्या रोपांची अधिक लागवड करून त्याचे संवर्धन करण्याचा विचार नगरपालिकेचा आहे. नगरपालिकेने वृक्ष संपदा मोजण्यासाठी विशेष निधीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करण्याचे निश्चित केले आहे. वृक्ष गणना होताच अशा वृक्षांची जातकुळी, त्याची दुर्मीळता, त्याचे नेमके ठिकाण याबाबतची समग्र माहिती संगणकामध्ये नोंदविण्यात येणार आहे. वृक्षांची अनधिकृत तोड झाल्यास किंवा त्यांच्या फांद्यांची कत्तल करण्यात आली असता ते ताबडतोब लक्षात आल्यामुळे विनापरवाना वृक्ष व फांद्यांच्या तोडण्याला आळा बसणार आहे. (प्रतिनिधी)तरू समितीचे दुर्लक्षशहरातील वृक्षसंपदा ही जमिनीतील पाण्याच्या स्तराची वृद्धी करून त्याचे संवर्धन करतो, असे असतानाही नगरपालिकेतील तरू समिती शहरात विविध ठिकाणी असलेल्या लहान-मोठ्या वृक्षांची कत्तल करण्यास हरकत नसल्याची शिफारस करते ; पण तरू समितीने शहराच्या हद्दीत नवीन वृक्षारोपणाबरोबर वृक्ष संगोपनाचे काम केले पाहिजे. त्याचबरोबर वृक्षांची विनापरवाना कत्तल करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद असताना पालिकेने त्यानुसार कधीही कोणावर कारवाई केल्याचे ऐकीवात नाही, अशी नागरिकांत चर्चा आहे.