शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विक्रीकर बुडविणाऱ्यांविरुद्ध गुन्ह

By admin | Updated: March 11, 2015 00:32 IST

उद्योजग, व्यापारी हवालदिल : विक्रीकर विभागाची धडक मोहीमे

एकनाथ पाटील -कोल्हापूर -उद्योग सुस्थितीत चालत असतानाही विक्रीकर बुडविणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. ही रक्कम एक कोटीपेक्षा जास्त असल्याने विक्रीकर विभागाच्यावतीने मार्चअखेरीमुळे करचुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून वसुलीची धडक मोहीम उघडण्यात आली आहे. या कारवाईच्या धसक्याने अनेक उद्योजक व व्यापाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. मूल्यवर्धित कराच्या (व्हॅट) वसुलीचे काम विक्रीकर विभाग करतो. विक्रीकर कायद्यानुसार उद्योजक व व्यापाऱ्यांना महिना, तीन किंवा सहा महिन्यांनी करदायित्वानुसार विवरणपत्र भरणे व भरलेल्या विवरणपत्रानुसार कराची रक्कम शासकीय कोषागारात जमा करणे बंधनकारक आहे; परंतु उद्योग सुस्थितीत चालत असतानाही काही व्यापारी या नियमांचे उल्लंघन करून कर व विवरणपत्र भरण्यास टाळाटाळ करीत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. शासनाकडून विक्रीकर विभागाला चालू वर्षी जिल्ह्यातून तब्बल ८५३.४१ कोटी कर जमा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी विक्रीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी चांगलाच चंग बांधला असून, त्यांनी करवसुलीचे विभागवार प्लॅनिंग केले आहे.गेली दहा-अकरा महिने व्यापारी व उद्योजकांना समजुतीची भूमिका घेत विवरणपत्र व त्यानुसार कर भरण्यासाठी प्रवृत्त केले जात होते; परंतु त्यांनी याचे गांभीर्य लक्षात न घेता कराचा भरणा केला नाही. आर्थिक वर्ष संपत आल्याने या विभागाने कडक भूमिका घेतली आहे. कर न भरणाऱ्यांवर थेट संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मूल्यवर्धित कर कायदा २००२ च्या कायद्यानुसार विवरणपत्र दाखल न करणाऱ्या तसेच कर न भरणाऱ्या उद्योजक व व्यापाऱ्यांवर अभियोग दाखल करण्याची तरतूद आहे. त्यानुसार बुडव्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची सुरुवात झाली आहे. तब्बल ८७ लाख ३२ हजार ८६८ रुपये कर भरला नसल्याचे निदर्शनास येताच ताराबाई पार्क येथील हरदेव स्टीलचे मालक सदरूमल एन. नागदेव यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचबरोबर ४९ लाख ४३ हजार ९०० एवढ्या कराच्या थकबाकीपोटी युनायटेड थर्मो कोस्टस, हातकणंगले या कंपनीवरही हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विक्री कर विभागातर्फे कारवाईची व्याप्ती वाढविण्यात येणार असून कसूरदार व्यापाऱ्यांना नोटिसा बजाविण्यात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. विवरणपत्र व त्यानुसार कर भरणे कायद्याने बंधनकारक आहे. कायद्यानुसार न वागणाऱ्या उद्योजक व व्यापाऱ्यांनी कारवाई टाळण्यासाठी तत्काळ कर भरणा करावा. - सुशीलकुमार शेळके, विक्रीकर उपायुक्त (विवरण व वसुली शाखा)