शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या लाटेतही कोरोना योद्ध्यांचे कार्य कौतुकास्पद : समरजित घाटगे : सीपीआरला दिली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 18:54 IST

CoronaVirus Kolhapur: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही कोरोना योद्ध्यांचे काम कौतुकास्पद असून, तेच दुसरी लाट परतून लावतील, असे उद्गार शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी काढले.

ठळक मुद्देदुसऱ्या लाटेतही कोरोना योद्ध्यांचे कार्य कौतुकास्पद : समरजित घाटगेसीपीआरला दिली भेट

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही कोरोना योद्ध्यांचे काम कौतुकास्पद असून, तेच दुसरी लाट परतून लावतील, असे उद्गार शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी काढले.येथील सीपीआर रुग्णालयाला त्यांनी भेट दिली व जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची माहिती घेतली. आवश्यक सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हर्षला वेदक, बंटी सावंत, आदी उपस्थित होते.शाहू ग्रुपमार्फत कोरोना प्रतिबंधक लसीचा वेग वाढविण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करू. शाहू साखर कारखान्यामार्फत चालविण्यात येत असलेल्या कोविड सेंटरवरही आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवू, असे घाटगे यांनी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माळी म्हणाले, दुसऱ्या लाटेमध्ये ज्या ठिकाणी पूर्वी कमी संसर्ग होता, त्या ठिकाणी आता जास्त संसर्ग आहे व तरुण वर्गामध्ये तो मोठ्या प्रमाणात आहे. प्रतिबंधक लस घेतल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. कोल्हापूर जिल्हा लसीकरणामध्ये पाचव्या क्रमांकावर असून, ४६ टक्केपर्यंत लसीकरण पूर्ण झाले आहे. वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेऊन पूर्ण खबरदारी घेऊन पूर्वतयारी केली आहे.मदतीसाठी शाहू अग्रेसरभविष्यातील धोका ओळखून सहा महिन्यांपूर्वीच शाहू कारखान्यावर कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. परवाच कारखान्यामार्फत रुग्णवाहिका सेवा सुरू केली. याशिवाय आरोग्य सेवेसाठी आणखी काही मदत लागल्यास सूचना करा, अशी विनंती वैद्यकीय अधिकाऱ्यांना केली. यावर उपस्थित अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधीलकीमध्ये ह्यशाहूह्ण नेहमीच अग्रेसर आहे, अशी प्रतिक्रिया देताच घाटगे यांनी नम्रपणे हात जोडून त्यांचे आभार मानले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगेkolhapurकोल्हापूर