शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : जिल्ह्यात ६३० रुग्ण कोरोनामुक्त , तर ३४ नव्या रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 19:20 IST

coronavirus, hospital, kolhapurnews  कोल्हापूर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणारे ६३० रुग्ण शनिवारी कोरोनामुक्त झाले, तर केवळ ३४ नवीन रुग्णांची नोंद झाली. तसेच आठ रुग्णांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देजिल्ह्यात ६३० रुग्ण कोरोनामुक्त , तर ३४ नव्या रुग्णांची नोंदकोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल

 कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणारे ६३० रुग्ण शनिवारी कोरोनामुक्त झाले, तर केवळ ३४ नवीन रुग्णांची नोंद झाली. तसेच आठ रुग्णांचा मृत्यू झाला.कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असून शनिवारी आणखी मोठा दिलासा मिळाला. संपूर्ण जिल्ह्यात केवळ ३४ नवीन रुग्ण आढळून आले. आतापर्यंतची रुग्णवाढीचा सर्वात निच्चांक आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ४७ हजार ७४२ इतकी झाली आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ४४ हजार ७५८ झाली आहे.गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात आठ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या १६२९ झाली आहे. मयत झालेल्यांमध्ये हातकणंगले तालुक्यातील दोन, पन्हाळा तालुक्यातील एक, शाहूवाडी तालुक्यातील दोन, करवीर तालुक्यातील एक, कागल तालु क्यातील एक, कोल्हापूर शहरातील एक रुग्णाचा समावेश आहे.आता केवळ १३५५ रुग्ण रुग्णालये तसेच घरात राहून उपचार घेत आहेत.आजरा, चंदगड, गगनबावडा तालुक्यात एकही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. भुदरगड, कागल,राधानगरी, शिरोळ येथे केवळ प्रत्येकी एकच रुग्णाची नोंद झाली. गडहिंग्लज तालुक्यात दोन, हातकणंगले तालुक्यात चार, करवीर तालुक्यात पाच तर कोल्हापूर शहरात १३ रुग्णांची नोंद झाली.तालुका निहाय रुग्ण संख्या -आजरा - ८३८, भुदरगड - ११९२, चंदगड - ११५४, गडहिंग्लज - १३७९, गगनबावडा - १४०, हातकणंगले - ५१८३, कागल - १६२०, करवीर - ५५००, पन्हाळा - १८२८, राधानगरी - १२१०, शाहूवाडी - १२७३, शिरोळ - २४३९, नगरपालिका हद्द - ७३०३, कोल्हापूर शहर - १४, ४९५, इतर जिल्हा - २१८८.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर