corona virus : जिल्ह्यात कोरोनाचे ५४६ नवीन रुग्ण, नऊ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 06:40 PM2020-09-26T18:40:31+5:302020-09-26T18:41:05+5:30

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ५४६ नवीन रुग्ण आढळून आले तर नऊ रुग्णांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. गेल्या काही दिवसापासून मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या २० ते २५ इतकी असायची ती शनिवारी नऊपर्यंत खाली आल्याने कोल्हापूरकरांना रुग्ण संख्या कमी होण्याबरोबरच आणखी एक दिलासा मिळाला.

corona virus: 546 new corona patients, nine deaths in the district | corona virus : जिल्ह्यात कोरोनाचे ५४६ नवीन रुग्ण, नऊ जणांचा मृत्यू

corona virus : जिल्ह्यात कोरोनाचे ५४६ नवीन रुग्ण, नऊ जणांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोनाचे ५४६ नवीन रुग्ण, नऊ जणांचा मृत्यूमृत्यूची संख्याही घटल्याने आरोग्य प्रशासनाला मोठा दिलासा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ५४६ नवीन रुग्ण आढळून आले तर नऊ रुग्णांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. गेल्या काही दिवसापासून मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या २० ते २५ इतकी असायची ती शनिवारी नऊपर्यंत खाली आल्याने कोल्हापूरकरांना रुग्ण संख्या कमी होण्याबरोबरच आणखी एक दिलासा मिळाला.

जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार ९८३ वर गेली असून मृत्यूंची संख्या १३६२ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमी होत असल्याचे चित्र असून शनिवारी मृत्यूची संख्याही घटल्याने आरोग्य प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला.

रुग्ण संख्या कमी होत चालली असल्याने कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब घेणे व त्याची तपासणी करण्याचे प्रमाण सुध्दा घटले आहे. मागच्या तीन दिवसात चाळीस ते पन्नास टक्क्यांनी हे प्रमाण घटले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होत चालला आहे.

ऑक्सीजन बेड मिळत नाहीत, व्हेंटिलेटर्स मिळत नाहीत या तक्रारी देखिल आता कमी झाल्या आहेत. जिल्हा व महानगरपालिका प्रशासनाने रोज कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुळे गोंधळलेली परिस्थिती हळुहळू सुधारत चालली आहे.

Web Title: corona virus: 546 new corona patients, nine deaths in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.