शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur-यात्रा काळात जोतिबा डोंगर शंभर टक्के ‘लॉकडाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 19:08 IST

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर वाडीरत्नागिरी येथील श्री जोतिबाच्या चैत्र यात्रा काळात तीन दिवस डोंगरावर शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे. सोमवार (दि. ६ ते ८) या काळात गावातील एकही नागरिक घराबाहेर पडणार नाही असा आदेशच ग्रामपंचायतीने काढला आहे. तर मानाच्या सासनकाठीधारकांनाही डोंगरावर येऊ नका, असे कळविले आहे.

ठळक मुद्देयात्रा काळात जोतिबा डोंगर शंभर टक्के ‘लॉकडाऊन’ग्रामपंचायतीचा निर्णय : तीन दिवस प्रवेश बंद

कोल्हापूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर वाडीरत्नागिरी येथील श्री जोतिबाच्या चैत्र यात्रा काळात तीन दिवस डोंगरावर शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात आले आहे. सोमवार (दि. ६ ते ८) या काळात गावातील एकही नागरिक घराबाहेर पडणार नाही असा आदेशच ग्रामपंचायतीने काढला आहे. तर मानाच्या सासनकाठीधारकांनाही डोंगरावर येऊ नका, असे कळविले आहे.दख्खनचा राजा श्री जोतिबाची वर्षातील सर्वांत मोठी चैत्र यात्रा मंगळवारी (दि. ७) होत आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच जिल्हा प्रशासनाने यात्रा रद्द केल्याचा निर्णय जाहीर केला आहे. दोन दिवसांपूर्वी पुन्हा याचा लेखी आदेश वाडी रत्नागिरी ग्रामपंचायतीला पाठविण्यात आला आहे. सध्या संचारबंदी लागू असली तरी यात्रा काळात काही भाविक डोंगरावर येण्याची शक्यता गृहित धरून ग्रामपंचायतीने यात्रेच्या आदल्या दिवसापासूनच गाव शंभर टक्के लॉकडाऊन केले आहे.

सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे तीन दिवस गावातील एकही नागरिक घराबाहेर पडणार नाही. तर बाहेरुन आलेल्या नागरिकाला डोंगरावर प्रवेश मिळणार नाही. मानाच्या सासनकाठ्या हे या यात्रेचे मुख्य आकर्षण असते, मात्र सर्व सासनकाठी धारकांना ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांनी फोन करून डोंगरावर येऊ नका, असे कळविले आहे. दरम्यान, यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावात निर्जंतुकीकरणाच्या औषधांची फवारणी करण्यात आली आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJyotiba Templeजोतिबाkolhapurकोल्हापूर