रेमडेसिविरच्या पुरवठ्यासाठी नियंत्रण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:22 IST2021-04-14T04:22:53+5:302021-04-14T04:22:53+5:30

जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून, रेमडेसिविर औषधाचीही मागणी वाढली आहे. सध्या जिल्ह्यात या औषधाचा ...

Control room for supply of remedivir | रेमडेसिविरच्या पुरवठ्यासाठी नियंत्रण कक्ष

रेमडेसिविरच्या पुरवठ्यासाठी नियंत्रण कक्ष

जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून, रेमडेसिविर औषधाचीही मागणी वाढली आहे. सध्या जिल्ह्यात या औषधाचा तुटवडा असून, ते मिळविण्यासाठी नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या औषधाची साठेबाजी, काळाबाजार रोखून औषध पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कोविड रुग्णालये व केअर सेंटरनी या औषधाची मागणी नियंत्रण कक्षाकडे करायची आहे. त्यानुसार स्टॉकिस्टकडे मागणी केली जाईल. वैयक्तिक नागरिक किंवा रुग्णाच्या नातेवाइकांकडून आलेली मागणी येथे स्वीकारली जाणार नाही. या कक्षाकडून मागणी व पुरवठा यामध्ये समन्वय साधून दैनंदिन साठा आवश्यकतेप्रमाणे राहील याची खबरदारी घेतली जाणार असून, काही गैरप्रकार आढळल्यास कोविड रुग्णालयाच्या व्यवस्थापनास जबाबदार धरले जाणार आहे.

---

रेमडेसिविर नियंत्रण कक्षाचा नंबर : ०२३१-२६५९२३२, २६५२९५०, २६५२९५३, २६५२९५४ व टोल फ्री क्रमांक १०७७, कोविड रुग्णालयांसाठी व्हॉट्सॲप नंबर : ८२७५१२१०७७. अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी असे : सपना कुपेकर, मनोज अय्या, ए. बी. कोळी, आर. पी. पाटील, एम. आर. मासाळ, व्ही. ए. उनवणे. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ.

--

Web Title: Control room for supply of remedivir