शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत काडीमोड, कोल्हापुरात घट्ट जोड; महाविकास आघाडीचे पालिकांचे जागा वाटप

By राजाराम लोंढे | Updated: November 17, 2025 12:51 IST

‘मनसे’ला सोबत घेणार?; जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची व्यूहरचना तयार

राजाराम लोंढेकोल्हापूर : मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने उद्धवसेनेसोबतची मैत्री तोडल्याने त्याचे परिणाम राज्याच्या राजकारणावर होणार हे निश्चित आहे. पण, कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी एकसंध राहणार आहे. नगरपालिका निवडणुकीत प्रत्येकाच्या ताकदीनुसार जागांचे वाटप झाले असून, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची व्यूहरचना तयार आहे.राज्यात २०१९ मध्ये अनपेक्षितपणे आकारास येत महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केली. सत्तेतून पाय उतार व्हावे लागले, तरी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका त्यांनी एकसंधपणे लढवल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला ते असेच सामोरे जातील, असे वाटत असतानाच मुंबई महापालिकेच्या निमित्ताने त्यांच्यामध्ये ठिणकी पडली आहे. ‘मनसे’ला सोबत घेतल्याने काँग्रेसने उद्धवसेनेसोबत काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे पडसाद राज्यभर उमटणार आहेत.पण, कोल्हापुरात तिन्ही पक्षांना एकमेकांची साथ हवी आहे. बलाढ्य महायुतीला तोंड द्यायचे असल्यास एकीने राजकारण करायला हवे, याची जाणीव तिन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांना आहे. त्यामुळे राज्य पातळीवर काहीही झाले, तरी जिल्ह्यात एकसंध राहण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापुरात ‘मनसे’ला सोबत घेणार का?कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी ‘मनसे’चे अस्तित्व आहे. मुंबईसह इतर महापालिकांमध्ये ते उद्धवसेनेसोबत राहणार असेच चित्र सध्या तरी दिसते. मात्र, कोल्हापुरात नेमके काय होणार, याची दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे.‘नंदाताईं’च्या भूमिकेने आघाडीत संमभ्रवस्थानंदाताई बाभूळकर यांनी ‘चंदगड’ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)सोबत जाण्याचा निर्णय घेतला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भाजपसोडून कोणाशीही आघाडी करण्याच मुभा दिली आहे. मात्र, या भूमिकेने आघाडीत काहीशी संमभ्रवस्था आहे.

महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकसंध आहोत. स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी आमची तयारी पूर्ण झाली असून, प्रत्येक जागा आम्ही ताकदीने लढणार आहोत. - आमदार सतेज पाटील (काँग्रेस गटनेते, विधान परिषद)स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकसंधपणेच लढणार आहे. रोज आमचा आढावा सुरू असून, मतदारसंघनिहाय व्यूहरचना केली जात आहे. - विजय देवणे (सहसंपर्क प्रमुख, उद्धवसेना)कोल्हापुरात आम्ही इंडिया आघाडी म्हणून एकत्रित लढणार आहोत. आमच्यामध्ये एक वाक्यता असून, त्यादृष्टीने आमची तयारी झालेली आहे. - व्ही. बी. पाटील (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष)

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai split, Kolhapur united: MVA seat sharing finalized for councils.

Web Summary : Despite Mumbai differences, Kolhapur's MVA remains united for local elections. Seat sharing is complete, focusing on strength. Leaders emphasize unity against the powerful Mahayuti alliance, prioritizing local needs over state-level disagreements.