(वाणिज्य....) सावंत सेंद्रिय मार्टचे उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:09 IST2021-02-20T05:09:56+5:302021-02-20T05:09:56+5:30

कोल्हापूर : सावंत सेंद्रिय मार्टचे उद्‌घाटन सरोज एन. पाटील यांच्या हस्ते झाले. कोल्हापूर शहरात प्रथमच ‘सावंत सेंद्रिय मार्ट’ सुरू ...

(Commerce ....) Inauguration of Sawant Organic Mart | (वाणिज्य....) सावंत सेंद्रिय मार्टचे उद्‌घाटन

(वाणिज्य....) सावंत सेंद्रिय मार्टचे उद्‌घाटन

कोल्हापूर : सावंत सेंद्रिय मार्टचे उद्‌घाटन सरोज एन. पाटील यांच्या हस्ते झाले. कोल्हापूर शहरात प्रथमच ‘सावंत सेंद्रिय मार्ट’ सुरू झाले असून, ग्राहकांना एकाच छताखाली सर्वप्रकारची सेंद्रिय उत्पादने मिळणार आहेत. सेंद्रिय धान्ये, कडधान्ये व सर्वप्रकारच्या डाळी, सेंद्रिय तुपातील गूळ, गूळ पावडर, सेंद्रिय साखर, काकवी, गीर गायीचे तूप तसेच सेंद्रिय लिंबू व आवळ्याची उत्पादने, लेमन क्रश, स्प्रेड, च्यवनप्राश व मोरावळा उपलब्ध आहेत.

यावेळी स्मितादेवी योगेश जाधव, प्रवीणसिंह घाटगे, अजयसिंह देसाई, डॉ. स्टीव्हन अल्वारिस, डॉ. संदीप पाटील, तानाजी सावंत, पी. डी. सावंत, पूजा सावंत, प्रतीक सावंत, सतीश सावंत, ललिता सावंत आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : सावंत सेंद्रिय मार्टचे उद्‌घाटन सरोज एन. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रवीणसिंह घाटगे, अजयसिंह देसाई, डॉ. संदीप पाटील आदी उपस्थित होते. (फोटो-१९०२२०२१-कोल-सावंत ॲग्रो न्यूज)

Web Title: (Commerce ....) Inauguration of Sawant Organic Mart