महाविद्यालयीन युवतीची नैराश्येतून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:47 IST2021-03-13T04:47:02+5:302021-03-13T04:47:02+5:30

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मधुजा ही शहरातील एका महाविद्यालयात १२ वी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. सध्या तिची पूर्वपरीक्षा ...

College girl commits suicide due to depression | महाविद्यालयीन युवतीची नैराश्येतून आत्महत्या

महाविद्यालयीन युवतीची नैराश्येतून आत्महत्या

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मधुजा ही शहरातील एका महाविद्यालयात १२ वी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती. सध्या तिची पूर्वपरीक्षा सुरू आहे. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास कुटुंबीयांसोबत जेवताना आपण तीन विषयांचे पेपर दिले नसल्याचे तिने सांगितले. त्यावेळी वडिलांनी तिची समजूत काढली होती. दरम्यान, दुपारी मधुजाने छताच्या लोखंडी हुकाला ओढणीने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले.

कुटुंबीयांनी तत्काळ तिला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. तिच्या पश्चात आई, वडील, आजी, काका, काकू, भाऊ, दोन चुलत बहिणी असा परिवार आहे. मधुजाचे वडील व चुलते येथील प्रतिष्ठित व्यापारी आहेत.

महादेव पाटील यांच्या वर्दीवरून पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. हेडकॉन्स्टेबल रविकांत शिंदे अधिक तपास करत आहेत.

मधुजा पाटील : १२०३२०२१-गड-०४

Web Title: College girl commits suicide due to depression