शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयात होणाऱ्या प्रथम वर्षाच्या परीक्षाही ऑनलाइन घ्याव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:23 IST

प्रथम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर होणार आहेत. या परीक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईन होणार असल्याचे समजते. मात्र, कोरोनाचा वाढता ...

प्रथम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर होणार आहेत. या परीक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईन होणार असल्याचे समजते. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रथम वर्षाची परीक्षा ही ऑनलाईन व्हावी. प्राध्यापकांनी आपल्या विषयाच्या बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्‍नांची 'क्वेश्चन बँक' तयार करावी. ही बँक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी. या 'क्वेश्चन बँक'मधील प्रश्न परीक्षेसाठी विचारावेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना कमी कालावधीमध्ये अभ्यास करणे शक्य होईल. सध्या विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेबद्दल संभ्रम आहे. कुलगुरूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधून संभ्रम दूर करावा. यामुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाऊ शकतील, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. कुलगुरूंना निवेदन दिलेल्या शिष्टमंडळात अधिसभा सदस्य पंकज मेहता, संजय परमणे, श्रीनिवास गायकवाड यांचा समावेश होता. दरम्यान, या परीक्षेबरोबरच निकाल, विद्यार्थी सुविधा केंद्र, आदी विषयांवर कुलगुरूंसमवेत चर्चा केली असल्याचे मेहता यांनी सांगितले.

चौकट

दुसऱ्या, तिसऱ्या वर्षाबाबतही निर्णय घ्या

दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या परीक्षाही ऑनलाइन घ्याव्यात. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांना संपर्कासाठी हेल्पलाइन सुरू करावी. भविष्यात नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीजन्य परिस्थितीत ऑनलाइन परीक्षा हाच पर्याय आहे. त्या दृष्टिकोनातून सिद्धता होणे गरजेचे आहे. यासाठी पूरक अभ्यासक्रम आणि बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेसाठी प्रश्नसाठा प्राध्यापकांनी करावा, याबाबतच्या सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना द्याव्यात, अशी मागणी या सदस्यांनी केली आहे.