शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

चिल्लर पार्टीने दाखविला छोट्यांना चित्रपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 11:36 IST

cinema Kolhapur-कोरोनाच्या नियमांचे पालन करत चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत रविवारी येथील शाहू स्मारक भवन येथे छोट्या मुलांसाठी एअरबड हा बालचित्रपट विनामूल्य दाखवण्यात आला. कोरोनामुळे वर्षभरानंतर मुलांनी शाहू स्मारक भवनात प्रवेश केला.

ठळक मुद्देवर्षभरानंतर शाहू स्मारकमध्ये मुलांचा प्रवेश देवेंद्र चौगुले यांचे मार्गदर्शन

कोल्हापूर : कोरोनाच्या नियमांचे पालन करत चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत रविवारी येथील शाहू स्मारक भवन येथे छोट्या मुलांसाठी एअरबड हा बालचित्रपट विनामूल्य दाखवण्यात आला. कोरोनामुळे वर्षभरानंतर मुलांनी शाहू स्मारक भवनात प्रवेश केला.

मुलांनी सिनेमापासून चांगले घ्यावे, त्यातील वेगवेगळ्या पात्रांचा अभ्यास करावा, यातून कोवळ्या वयात काही शिकायला मिळेल, या संस्काराची गरज आहे, असे आवाहन अभिनेता, प्रेरणादायी वक्ते देवेंद्र चौगुले यांनी यावेळी केले.

मिलिंद कोपर्डेकर यांनी ह्यशिनेमा पोरांचाह्ण हे पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले. लॉकडाऊनमध्ये चिल्लर पार्टीने केलेल्या कामाची माहिती मिलिंद यादव यांनी सांगितली. यावेळी हेल्पर्स, खेळघर, अवनि आणि सुधाकर जोशी नगरातील कार्यकर्त्यांचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. चित्रपटानंतर सर्व मुलांना खाऊ देण्यात आला.

हेल्पर्स ऑफ हँडिकॅप्ड, अवनी, खेळघर, सुधाकर जोशीनगरमधील मुलांसह सुमारे दोनशे छोट्या दोस्तांनी या चित्रपटांचा आनंद घेतला. यावेळी चिल्लर पार्टीचे शिवप्रभा लाड, पद्मश्री दवे, महेश नेर्लीकर, सलीम महालकरी, अनिल काजवे, ओंकार कांबळे, अभय बकरे, सचिन पाटील, गुलाबराव देशमुख उपस्थित होते.

४७ चित्रपट दाखविले ऑनलाईन

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरात चिल्लर पार्टीतर्फे प्रत्यक्ष चित्रपट दाखविण्यात आले नव्हते. मात्र, लॉकडाऊनमध्ये चिल्लर पार्टीने सुमारे दोन हजार छोट्या मुलांना जगभरातील ४७ चित्रपट ऑनलाईन पध्दतीने दाखविले.
 

टॅग्स :cinemaसिनेमाkolhapurकोल्हापूर