शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य संशयित मनीष नागोरी याला अटक

By admin | Updated: November 3, 2016 00:46 IST

खुनाची सुपारी : वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी लाहोरियाची सुपारी; नागोरीचा खुलासा

 इचलकरंजी : दोन महिन्यांपूर्वी नवी मुंबई येथील बांधकाम व्यावसायिकाच्या खुनाची सुपारी घेतल्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व आंतरराज्य पिस्तुल तस्कर मनीष नागोरी याला बुधवारी शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील स्वप्निल फातले याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, आर्थर रोड जेलमध्ये असलेला बिल्डर सुरेश बिजलानी याच्या खुनाची सुपारी मनीष नागोरी याने घेतली होती. त्याने ही कामगिरी स्वप्निल फातले याच्यावर सोपविली होती. पण २६ सप्टेंबर रोजी शहापूर पोलिसांनी संशयावरुन फातले याला ताब्यात घेतले असता हे प्रकरण उघडकीस आले होते. तर नागोरी हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. तेव्हापासून फरार असलेल्या संशयित मनीष नागोरीचा पोलिस शोध घेत होते. मनीष नागोरी हा एका गुन्ह्यात ठाणे कारागृहात असताना त्याची ओळख विनोद नावाच्या क्रिकेट बेटिंग घेणाऱ्या मुख्य बुकीबरोबर झाली होती. विनोद हा छोटा राजन टोळीशी संबंधित होता. विनोद याची नवी मुंबई येथील बिल्डर सनी लाहोरिया यांच्याशी घनिष्ठ मैत्री होती. दरम्यानच्या काळात सनी याचे वडील सुनील लाहोरिया यांची हत्या झाली. त्या हत्येमध्ये बिल्डर बिजलानी याचा हात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याने सनी हा बिजलानीवर चिडून होता. त्याने यासंदर्भात विनोद याला माहिती दिली होती. तर विनोदने बिजलानी याच्या हत्येची सुपारी कोल्हापूर भागातील शूटर्सना देण्याचा डाव आखला होता. त्यासाठी विनोद व सनी यांनी यड्राव परिसरातील एका आलिशान हॉटेलमध्ये मनीष नागोरी याच्याशी पहिली बैठक केली. त्यामध्ये हत्येची सुपारी पक्की होऊन नागोरी यास दहा लाख रुपये अ‍ॅडव्हान्स दिले होते. दरम्यानच्या काळात विनोद याचा मृत्यू झाल्याने सनीने नागोरी याच्याशी थेट संपर्क ठेवला होता. सनी हा मनीषला प्रत्येक भेटीवेळी नवीन हॅन्डसेट व सीमकार्ड वापरण्यास देत होता. त्यावरुन तो सनी याच्याशी संपर्क करीत होता. दरम्यानच्या काळात बिजलानी याच्यावर प्राणघातक हल्ला झाला; पण तो त्यातून सुदैवाने बचावला. संशयावरून ताब्यात घेतलेल्या स्वप्निल याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तुल, दोन मॅगझिन, आठ जिवंत काडतुसे आणि रोख दहा हजार रुपये असा एक लाख २१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. त्याच्या चौकशीत बांधकाम व्यावसायिक बिजलानी याच्या खुनाची सुपारी घेतल्याचे उघड झाले होते. ही सुपारी मनीष नागोरी याने घेतली असून, त्यासाठी पिस्तुल दिले असल्याचे सांगून मनीषसह तो उचगाव येथून पनवेलकडे जाणार असल्याचे फातले याने सांगितले होते. बिजलानी याला तारखेसाठी न्यायालयात नेण्यात येणार होते. त्यावेळी त्याचा गेम करण्याचा कट रचल्याचे फातले याने त्यावेळी सांगितले होते. (वार्ताहर)