शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चिकोत्रा भूसंपादनाचा स्लॅब आठ एकर

By admin | Updated: August 22, 2014 00:31 IST

हसन मुश्रीफ : अंमलबजावणीबाबत विभागीय आयुक्तांना सूचना

कोल्हापूर : चिकोत्रा प्रकल्पाचा भूसंपादनाचा स्लॅब चार एकरांऐवजी आठ एकर करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे लाभक्षेत्रांतील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. याबाबतचे आदेश पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी देऊन त्यांची अंमलबजावणी करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त (पुणे) यांना दिल्या आहेत, अशी माहिती जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांनी आज, गुरुवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.भूसंपादनाचा चार एकरांचा स्लॅब रद्द करून तो आठ एकर करावा, अशी चिकोत्रा खोऱ्यातील शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. २२ जुलै २०१४ रोजी मंत्री पतंगराव कदम यांनी चिकोत्रा प्रकल्पाचा चार एकरांचा स्लॅब रद्द करून तो आठ एकर करण्याचा आदेश दिला. त्यानुसार त्याच्या अंमलबजावणीचे आदेश विभागीय आयुक्त, पुणे यांना दिले. कुटुंबाचा चरितार्थ चार एकरांवर चालणे अशक्य होते. एकत्र कुटुंबाची खाती झालेली नव्हती, अनेक भावांच्या वाटण्या झालेल्या नव्हत्या, अशा अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर होत्या. त्यामुळे अनेक दिवस चाललेला हा संघर्ष संपविण्यामध्ये यश मिळाले आहे.चिकोत्रा धरण हे अद्याप ६० टक्के झालेले नाही. पावसाच्या अनिश्चिततेमुळे धरण भरेल की नाही, याची चिंता आहे. या धरणामध्ये सर्व ओढे, नाले यांचे पाणी यावे म्हणून यांत्रिकी विभागाची सर्व यंत्रसामग्री त्या ठिकाणी पाठविली आहे. नागनवाडी प्रकल्प झाल्याशिवाय चिकोत्रा खोऱ्याची तहान भागणार नाही. त्यामुळे पुढील वर्षी हा प्रकल्प पूर्ण केला जाईल. प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी नवीन संकलनाप्रमाणे ११२ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. सध्या १३० हेक्टर जमीन उपलब्ध आहे. त्यामधून नागनवाडी प्रकल्पाचे पुनर्वसन होणार आहे. याबाबत लवकरच बैठक घेऊन खात्री दिली जाईल. नवीन पुनर्वसन कायद्याप्रमाणे कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चांगले पॅकेज देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार पॅकेज घेण्याचा पर्याय प्रकल्पग्रस्तांसमोर ठेवण्यात आला आहे. आलाबाद व गलगले गावांतील शेतकऱ्यांवर भूसंपादनामध्ये अन्याय झाल्याचे सकृत्दर्शनी सिद्ध झाले आहे. त्यांची बैठक मंगळवारी (दि. १९) मंत्री पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ज्या-ज्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे, त्या-त्या शेतकऱ्यांना सुनावणी देऊन विभागीय आयुक्त, पुणे यांनी तत्काळ बेकायदेशीरपणे घेतलेल्या जमिनी त्यांना परत कराव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत, असे या पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)