झाडे तोडणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:24 IST2021-04-18T04:24:07+5:302021-04-18T04:24:07+5:30

दिलीप चंगेडिया (रा. कापड मार्केट), संदेश धोंडिलाल शहा (रा. हॉटेल सिटी इनजवळ), दीपक रामेश्‍वर राठी (रा. आवाडे अपार्टमेंट) व ...

Charges filed against four for cutting down trees | झाडे तोडणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

झाडे तोडणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

दिलीप चंगेडिया (रा. कापड मार्केट), संदेश धोंडिलाल शहा (रा. हॉटेल सिटी इनजवळ), दीपक रामेश्‍वर राठी (रा. आवाडे अपार्टमेंट) व रियाज अहमद शेख (रा. लिगाडे मळा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शहरात विनापरवाना मोठ्या प्रमाणात वृक्षांची तोड सुरू आहे. या संदर्भात नगरपरिषदेच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जागेवर जाऊन पाहणी केली. त्यावेळी हौसिंग कॉम्प्लेक्समधील ८ अशोक जातीचे वृक्ष चेअरमन दिलीप चंगेडिया यांनी अर्धवट तोडल्याचे आढळून आले. तसेच हॉटेल सिटी इनजवळील संदेश शहा यांनी त्यांच्या खासगी जागेतील प्लेटोफार्म २, १ लिंब, १ इलायची चिंच व काटेरी झुडूप अशी ५ झाडे तोडल्याचे निदर्शनास आले. आवाडे अपार्टमेंटमधील दीपक राठी यांनी त्यांच्या बंगल्यातील टिबुबिया जातीचे १ तर लिगाडे मळा येथील सलीम मुल्ला यांच्या मालकीच्या दुकान गाळ्यासमोरील लिंबाचे झाड रियाज शेख यांनी अर्धवट तोडल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या सर्वांवर झाडाचे संरक्षण, जतन व अधिनियम १९७५चे कलम २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Charges filed against four for cutting down trees