चंद्रकांत पाटील वाढदिनी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:25 IST2021-05-13T04:25:37+5:302021-05-13T04:25:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ६० लाख ...

Chandrakant Patil's decision to set up an oxygen plant on his birthday | चंद्रकांत पाटील वाढदिनी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा संकल्प

चंद्रकांत पाटील वाढदिनी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ६० लाख रुपयांचा ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. कणेरी मठ येथे हा प्लांट उभारण्यात येईल.

पाटील यांचा १० जून हा वाढदिवस गेली अनेक वर्षे विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येतो. स्वयंसिद्धा संस्थेस प्रोजेक्टर, रोपांच्या माध्यमातून शुभेच्छा स्वीकारून शहर सुशोभीकरणाला मदत, ३५ हजार झाडांची शहरात लागवड, ५० हजार शेतकऱ्यांना युरिया खताचे वाटप, सावली केअर सेंटरला मदत, गतवर्षी विविध हौसिंग सोसायट्यांना सॅनिटायझर स्टॅंड, थर्मल स्कॅनर वितरित करण्यात आले.

गतवर्षी कणेरी मठावर ४० बेडचे सुसज्ज कोविड सेंटर उभारण्यात आले होते. आता याच ठिकाणी ६० लाखांचा ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा प्लांट उभारण्यात येत असल्याने इच्छुकांनी आपला सामाजिक उभारणीमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन वाढदिवस समितीच्या वतीने राहुल चिकोडे यांनी केले आहे.

Web Title: Chandrakant Patil's decision to set up an oxygen plant on his birthday