शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावात गणेशपुरकडे जाणाऱ्या रस्त्यावर "बर्निंग कार"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 19:29 IST

रस्त्यावरून जाणाऱ्या एका कार गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना कॅम्प मिलिटरी हॉस्पिटलनजीक गणेशपुरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आज मंगळवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली.

ठळक मुद्देबेळगावात गणेशपुरकडे जाणाऱ्या रस्त्यावर "बर्निंग कार""बर्निंग कार" पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी

बेळगाव : रस्त्यावरून जाणाऱ्या एका कार गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना कॅम्प मिलिटरी हॉस्पिटलनजीक गणेशपुरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आज मंगळवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली.याबाबत समजलेली माहिती अशी की, दुर्घटनाग्रस्त सेंट्रो कार बेळगाव कडून गणेशपुरच्या दिशेने निघाली होती. कॅम्प परिसरातील मिलिटरी हॉस्पिटल रस्त्यावर शौर्य चौकाजवळ सदर कारच्या बोनेटमधून धूर येण्यास सुरुवात होऊन अचानक भडका उडाला.

प्रसंगावधान राखून कारमधील चालकासह इतरांनी कार जागेवरच थांबवून सुरक्षित स्थळी धाव घेतली. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.सदर दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नसली तरी कारचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कारचा दर्शनीय भाग तर जळून बेचिराख झाला. रस्त्यावरील "बर्निंग कार"चा हा प्रकार पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती.

 

टॅग्स :fireआगkolhapurकोल्हापूरbelgaonबेळगाव