शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आत्मनिर्भर पॅकेज कुठे गेले ? युवक कॉग्रेसची चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 18:00 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीच्या काळात २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. मात्र चार महिने झाले एक दमडीही मिळालेली नाही. या पॅकेजचे केंद्र सरकारने केले काय? याचा जाब विचारण्यासाठी शनिवारी युवक कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी निदर्शने केली.

ठळक मुद्देआत्मनिर्भर पॅकेज कुठे गेले ? युवक कॉग्रेसची चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर निदर्शनेधनंजय महाडिक यांच्या कार्यालयासमोरही कार्यकर्ते आक्रमक

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीच्या काळात २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. मात्र चार महिने झाले एक दमडीही मिळालेली नाही. या पॅकेजचे केंद्र सरकारने केले काय? याचा जाब विचारण्यासाठी शनिवारी युवक कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी निदर्शने केली. त्याचबरोबर भाजपचे प्रदेश सदस्य, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्यालयासमोरही त्यांनी जोरदार निदर्शने केली, अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करीत निदर्शकांना ताब्यात घेतले.कोरोना महामारीच्या काळात देशभरातील उद्योग बंद पडले, तरुणांचा रोजगार गेला अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा होती. आत्मनिर्भरच्या गोंडस नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटीचे पॅकेज जाहीर केले. गेले चार महिने अद्याप दमडीही मिळालेली नाही.

हे पॅकेज सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेले नाही, मग गेले कोठे? असा जाब विचारत युवक कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी फलक झळकावत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी निदर्शने केली. त्याचबरोबर धनंजय महाडिक यांच्या ताराराणी चौकातील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.चंद्रकांत पाटील हे आंदोलनकर्त्यांच्या भावना समजावून घेण्यापेक्षा घरी देवघरात पूजा करण्यात मग्न होते. आम्हाला पॅकेजचे काय झाले, याचे उत्तर अपेक्षित होते. यापुढे भाजपच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला जाब विचारला जाईल, असा इशारा कल्याणी माणगावे यांनी सांगितले. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, उपाध्यक्ष बयाजी शेळके, दीपक थोरात, उदय पोवार, विनायक पाटील, योगेश कांबळे, लखन भोगम, संजय सरदेसाई, संभाजी पाटील, आनंदा करपे, सनी सावंत, अनिल कांबळे, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :congressकाँग्रेसchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर