शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-कॉँग्रेसमध्ये कुरघोडीचे राजकारण

By admin | Updated: August 14, 2015 23:59 IST

सभापती निवडी : निवडणुकीच्या स्थगितीमुळे हाळवणकर यांची कॉँग्रेसवर कुरघोडी

राजाराम पाटील - इचलकरंजीयेथील नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या सभापतिपदाच्या निवडणुकीला स्थगिती देऊन आमदार सुरेश हाळवणकर यांनी कॉँग्रेसवर कुरघोडी केली आहे. परिणामी भाजप आणि कॉँग्रेसमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे.इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात इचलकरंजी शहर तसेच चंदूर, कबनूर, कोरोची, तारदाळ आणि खोतवाडी अशा गावांचा समावेश आहे. मात्र, इचलकरंजीची लोकसंख्या तीन लाख असल्याने मतदारसंघावर शहराचेच वर्चस्व राहते. सन २०११ मध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीत कॉँग्रेसचे २९, राष्ट्रवादीचे ११ व भाजपप्रणीत शहर विकास आघाडीचे १७ असे नगरसेवक निवडून आले. साहजिकच कॉँग्रेसने पालिकेत सत्ता स्थापन केली.या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत नगराध्यक्षपदाची मुदत संपली; पण शुभांगी बिरंजे यांनी ‘शविआ’ व राष्ट्रवादीतील कारंडे गटाच्या पाठिंब्यावर बंड केले. पालिकेत आमदार हाळवणकर यांच्या नेतृत्वाखालील ‘शविआ’ ने कॉँग्रेसच्याच सत्तेला शह दिला; पण कॉँग्रेसने बिरंजे यांना सहकार्य देऊन काटशह दिला.ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही येथील राजकारणाचे पडसाद उमटले. चंदूरमध्ये कॉँग्रेसने बहुमत गमावले, तर कबनूरमध्ये भाजपला १५ पैकी फक्त चार सदस्यांवर समाधान मानावे लागले. आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकीपाठोपाठ इचलकरंजीतील नगरपालिका प्राथमिक शिक्षक मंडळाची सभापती निवड १३ आॅगस्टला होती. मात्र, शिक्षण मंडळावर शासन नियुक्त सदस्यांची नेमणूक नसल्याने दोन्ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे भाजपचे राजू हणबर यांनी शासनाच्या शिक्षणमंत्र्यांकडे, शिक्षण मंडळाकडील सदस्य संख्या अपूर्ण असल्याची तक्रार केली. या तक्रारीचा पाठपुरावा आमदार हाळवणकर यांनी केला आणि शिक्षण मंडळ सभापती निवडीला स्थगिती घेतली. सभापतिपद वादग्रस्तच सन २०१२ मध्ये नगरपालिका शिक्षण मंडळाकडे कॉँग्रेसचे सहा, राष्ट्रवादीचा एक व ‘शविआ’ चे तीन असे सदस्य निवडले गेले. त्यानंतर कॉँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी एक शासन नियुक्त सदस्य निवडीसाठी शेखर शहा व मेहबूब मुजावर यांची नावे घोषित झाली; पण त्यांची नावे शासकीय राजपत्रात समाविष्ट झाली नाहीत. तरीही प्रथम दत्तात्रय कित्तुरे व नंतर तौफिक मुजावर हे सभापती झाले. आता मुजावर यांनी राजीनामा दिल्याने सभापतिपदासाठी निवडणूक लागली; पण नगरपालिकेतील बदललेले राजकीय संदर्भ आणि कॉँग्रेस व भाजपच्या कुरघोड्या यातच सभापती निवड अडकली आहे.