शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

भाई वैद्य यांना ‘शाहू’ पुरस्कार कोल्हापुरात शुक्रवारी वितरण

By admin | Updated: June 23, 2015 00:59 IST

गेल्या ७० वर्षांपासून सामाजिक चळवळीत कार्यरत असलेल्या भाई वैद्य यांनी जातीव्यवस्था, सामाजिक अन्याय व विषमता, राजकीय दडपशाही व वंचितांवरील अन्यायाविरुद्ध संघर्ष केला.

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा राजर्षी शाहू पुरस्कार यंदा ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांना देण्यात येणार आहे. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. रोख रक्कम एक लाख रुपये व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. आतापर्यंतचा हा तिसावा पुरस्कार आहे.शाहू महाराजांच्या जयंतीदिनी म्हणजेच शुक्रवारी (दि.२६) संध्याकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक भवनमध्ये ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील असतील.गेल्या ७० वर्षांपासून सामाजिक चळवळीत कार्यरत असलेल्या भाई वैद्य यांनी जातीव्यवस्था, सामाजिक अन्याय व विषमता, राजकीय दडपशाही व वंचितांवरील अन्यायाविरुद्ध संघर्ष केला. विद्यार्थीदशेतच १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीत सहभाग घेतल्यानंतर ते १९४३ मध्ये राष्ट्रसेवा दलात सामील झाले. सामाजिक कार्यासाठी त्यांना १९६० मध्ये ‘युनेस्को’ची शिष्यवृत्ती मिळाली. या काळात त्यांनी गोवामुक्ती चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, महागाईविरोधी चळवळीत भाग घेतला. ते १९६२ मध्ये डॉ. राममनोहर लोहिया यांच्या समाजवादी पक्षात सामील ते त्यांच्या फावडा, तुरुंग व मतपेटी या तत्त्वानुसार आचरण केले. या कालावधीत ते २५ वेळा तुरुंगात गेले. ते १९६२ ते ७७ या काळात महापालिकेचे सदस्य होते, १९७४-७५ मध्ये पुण्याचे महापौर होते. त्याचवर्षी ते अखिल भारतीय महापौर परिषदेचे अध्यक्ष झाले. १९७८ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले त्याचवर्षी पुलोद सरकारमध्ये गृहराज्यमंत्री होते. त्यानंतर ते जनता पक्षाचे नेते चंद्रशेखर यांच्या भारत यात्रेत सामील झाले. राष्ट्रसेवा दल, समाजवादी जनपरिषद व भारत यात्रा ट्रस्टचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले व समाजप्रबोधनाचे कार्य चालू ठेवले. भार्इंना त्यांच्या कार्याबद्दल गोवा क्रांतीदिन पुरस्कार, मौलाना आझाद सद्भावना पुरस्कार, समता भूषण पुरस्कार, महात्मा फुले पुरस्कार अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी आजवर केलेल्या कार्याचा विचार करून यावर्षीचा शाहू पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहे. परिषदेस डॉ. अशोक चौसाळकर, पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे उपस्थित होते.यापूर्वीचे मानकरी...महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात या पुरस्काराला खूप मोलाचे स्थान आहे. आजपर्यंत हा पुरस्कार भाई माधवराव बागल, वि. वा. शिरवाडकर, न्यायमूर्ती पी. बी. सावंत, प्रा. एन. डी. पाटील, आशा भोसले, मायावती, गोविंद पानसरे, प्राचार्य पी. बी. पाटील, शंकरराव खरात, आदी मान्यवरांना देण्यात आला आहे.