शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीपुरीत बिर्याणी गाडीचालकाचा खून

By admin | Updated: November 14, 2014 01:01 IST

चेष्टेचे कारण; संशयित ताब्यात

कोल्हापूर : मद्यप्राशन करताना चेष्टा केल्याच्या कारणावरून बिर्याणी गाडीचालकाचा खून झाल्याची घटना आज, गुरुवारी रात्री लक्ष्मी रोडवरील एका दुकानाच्या दारात घडली. असीफ सलीम मोमीन (वय ३५ रा. रविवार पेठ बँकेसमोर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी संशयित अब्दुलअजिझ मोहिद्दीन मलबारी (५८ रा. सिरत मोहल्ला, जवाहरनगर) याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.असीफ मोमीन याचा खून झाल्याचे समजताच सीपीआर आवारात त्याच्या मित्र, नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, असीफ मोमीन याची लक्ष्मीपुरीतील श्रद्धानंद हॉलशेजारी व गंगावेश येथे बिर्याणीची गाडी आहे. आज रात्री मद्यप्राशन करण्यासाठी लक्ष्मीरोड येथील एका बिअर बारमध्ये असिफ व अब्दुलअजिझ हे दोघे गेले होते. त्यावेळी दोघांत वाद झाला. या वादामधून दोघे बारमधून बाहेर आले. त्यानंतर लक्ष्मी रोडवरील एका दुकानाजवळ ते आले असता अचानक संशयित अब्दुलअजिजने स्वत:जवळील चाकूने असीफच्या छातीवर हल्ला केला. त्यावर असीफ जागीच कोसळला. त्यानंतर काही जणांनी असिफला सीपीआरमध्ये उपचारासाठी आणले. पण, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, हल्ल्यानंतर काहीवेळ अब्दुलअजिझ हा तेथेच थांबून होता. हा प्रकार समजताच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी संशयित अब्दुलअजिझला पकडले. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता मद्यप्राशन करताना नेहमी असीफ माझी चेष्टा करायचा’ अशा रागामधून त्याच्यावर हल्ला केला असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. संशयित हा स्क्रॅप मटेरियल व मासेविक्रीचा व्यवसाय आहे.मृत असीफ हा विवाहित आहे. त्याचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याच्या भावाने संशयित अब्दुलअजिझ मलबारीला ताब्यात घेतल्याशिवाय असिफवर अंत्यसंस्कार करायचे नाही, असा पवित्रा सीपीआरमध्ये पोलिसांसमोर घेतला. त्यामुळे काही काळ वातावरण तंग बनले होते. नातेवाईकांनी त्याची समजूत काढल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास तो तयार झाला. (प्रतिनिधी)