शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: ‘करेक्ट’ कार्यक्रमावरून जुंपली, महायुती-काँग्रेस भिडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 12:46 IST

..तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम केला असता - सतेज पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका जिंकल्यानंतर महायुतीकडून कॉंग्रेसला मोठ्या फलकाद्वारे डिवचण्यात आले आहे. ‘धन्यवाद कोल्हापूरकर, कॉंग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केलात’ असा मजकूर आणि महायुतीच्या नेत्यांची छायाचित्रे असलेले मोठमोठे फलक कोल्हापूरमध्ये उभारण्यात आले आहेत. यावर कॉंग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनीही वेगवेगळे लढला असता तर कोल्हापूरच्या जनतेने तुमचाच ‘करेक्ट’ कार्यक्रम केला असता असे प्रत्युत्तर सोमवारी दिले आहे.

गतवेळची विधानसभा, चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतरची पोटनिवडणूक आणि नंतरची लोकसभा या तीनही निवडणूका कॉंग्रेसने सलग भाजप, शिंदेसेनेला चितपट केले होते. लोकसभेला देखील शाहू छत्रपती यांच्या माध्यमातून कॉंग्रेसने मास्टर स्ट्रोक मारत ही जागा खेचून घेतली.

वाचा: कोल्हापुरात काँग्रेस-शिंदेसेना एकत्र येणार ?; सतेज पाटील म्हणाले, बंददाराआडची चर्चा जाहीर कशी करू

मात्र त्यानंतर कोल्हापूरच्या दोन्ही विधानसभेच्या जागा भाजप, शिंदेसेनेने पटकावल्या. त्यानंतर महायुतीसाठी कोल्हापूर महापालिका महत्त्वाची होती. त्यामध्ये यश मिळवल्यानंतर मात्र ‘मनात तेच मनपात’ या फलकांच्याही पुढे जाऊन महायुतीने कॉंग्रेसला करेक्ट कार्यक्रम झाल्याचे फलक लावून डिवचले आहे.

आम्ही कोणताही चुकीचा फलक लावलेला नाही. कोल्हापूरच्या जनतेने महायुतीला निर्णायक असे बहुमत दिले आहे. कोल्हापूर महापालिकेच्या इतिहासात भाजपला सर्वाधिक जागा पहिल्यांदा मिळाल्या आहेत. त्यामुळेच जनतेनेच कॉंग्रेसचा जो करेक्ट कार्यक्रम केला त्याबद्दल आम्ही एकदा नाही हजारदा कोल्हापूरकरांचे आभार मानू. त्याला कोणी आक्षेप घेण्याची गरज नाही. - खासदार धनंजय महाडिक

वेगवेगळे लढला असता तर तुमचाच करेक्ट कार्यक्रम केला असता, सतेज पाटील यांचा पलटवार 

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढले, ते वेगवेगळे लढले असते तर कोल्हापूरकरांनी महायुतीचाच करेक्ट कार्यक्रम केला असता, या शब्दांत काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी महायुतीच्या पोस्टरबाजीवर पलटवार केला. 

‘धन्यवाद कोल्हापूरकर.. काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केलात!’ अशी बॅनरबाजी महायुतीने शहरभर करून काँग्रेसला डिवचले आहे. त्यावर आमदार पाटील यांनी “वेगळे लढला असता तर तुमचाच कार्यक्रम केला असता,” असे प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, “महायुतीने वेगवेगळे लढायला हवे होते. तुमची एवढी ताकद होती तर वेगवेगळे का लढला नाही. आमचे पाच उमेदवार पाचशेच्या आत मतांनी पराभूत झाले आहेत. त्यामुळे कोल्हापुरात महायुतीचा तांत्रिक विजय झाला आहे. जे चांगले आहे त्याला पाठिंबा असेल. मात्र, चुकीचे असेल तर त्यावर लक्ष असेल. आमचा ३५ चा आकडा मोठा आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांना तितकं सोपं नाही, असा इशाराही आमदार पाटील यांनी दिला.

अडीच-अडीच वर्षे महापौर करा

कोल्हापुरात महायुतीला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे हिंमत असेल तर त्यांनी अडीच-अडीच वर्षे महापौर करावा, असे आव्हानही त्यांनी दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Election: Alliance taunts Congress; Patil retorts with solo fight challenge.

Web Summary : After Kolhapur's municipal victory, the ruling alliance mocked Congress with banners. Congress leader Satej Patil retorted, suggesting the alliance would have lost if they'd contested separately. He challenged them to split the mayoral term.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Mahayutiमहायुतीcongressकाँग्रेस