बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:21 IST2021-04-13T04:21:41+5:302021-04-13T04:21:41+5:30

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उद्या बुधवारी साजरा होणारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करावी, प्रभात फेरी, ...

Babasaheb Ambedkar Jayanti should be celebrated simply | बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करावी

बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करावी

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उद्या बुधवारी साजरा होणारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करावी, प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतच्या सूचना जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, महापालिका, नगरपालिका अधिकाऱ्यांना पत्राद्वारे पाठवल्या आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्यंत साधेपणाने सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत जयंती साजरी करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला किंवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना एकावेळी पाचपेक्षा जास्त व्यक्ती नसावेत तसेच तेथे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले जावे. सार्वजनिक ठिकाणी गाणी, व्याख्याने, पथनाट्य किंवा सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ नयेत. या कार्यक्रमाचे केबल नेटवर्कद्वारे अथवा ऑनलाइन प्रक्षेपण करता येईल. स्थानिक प्रशासनाच्या मंजुरीनंतर केवळ आरोग्यविषयक उपक्रम किंवा शिबिरे घेता येतील.

--

Web Title: Babasaheb Ambedkar Jayanti should be celebrated simply