शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

प्राधिकरण ‘निवडणूक निधी’ला होणार विरोध

By admin | Updated: December 17, 2014 23:59 IST

सहकारी संस्था एकवटल्या : गडहिंग्लजला आज बैठक

राम मगदूम - गडहिंग्लज -सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक निधी व भत्त्यासंदर्भात राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जारी केलेल्या अन्यायी परिपत्रकाच्या विरोधात गडहिंग्लज उपविभागातील संस्था एकवटल्या आहेत. खर्चिक निवडणुका ग्रामीण संस्थांना न परवडणाऱ्या असल्याची त्यांची भावना असून, प्राधिकरणाच्या फतव्याविरुद्ध संघर्षाची चिन्हे आहेत. यासंदर्भात उद्या, गुरुवारी गडहिंग्लजमध्ये होणाऱ्या संस्था प्रतिनिधींच्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरणार आहे.यापूर्वी सहकारी संस्थांच्या निवडणुका खात्याच्या परवानगीनेच परंतु संस्था पातळीवर घेतल्या जात. मात्र, संस्थांच्या कामकाजात व त्यांच्या निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या सहकारी कायद्यातील घटना दुरुस्तीनंतर निवडणूक प्राधिकरण स्थापण करण्यात आले आहे.महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) नियम २०१४ मधील चारमध्ये सहकारी संस्थांचे अ,ब,क आणि ड असे प्रकार करण्यात आलेले आहेत. त्यापैकी पहिल्या टप्यात ‘क’ वर्गातील संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात प्राधिकरणाने जारी केलेल्या परिपत्रकात निवडणूक निधी व भत्त्यासंदर्भात निर्देश आहेत. नव्या नियमानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा भत्ता, अन्य खर्च व सभासद संस्थेवर निर्धारित निवडणूक निधी लहान व अडचणीतील संस्थांना परवडणारे नाही. प्राधिकरणाच्या अन्यायी निवडणूक खर्चामुळे संस्था आणखी अडचणीत येतील, असा संस्था चालकांचा आक्षेप आहे. यापूर्वी संस्था पातळीवर घेतल्या जाणाऱ्या निवडणुका कमी खर्चात होत. निवडणूक निधी व खर्च छोट्या संस्थांना परवडणारा नाही. जनतेच्या करातून पगार घेणाऱ्या सहकारी अधिकाऱ्यांनी विना मोबदला निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहावे. काटकसरीसाठी पूर्वीप्रमाणेच निवडणूक खर्चासंबंधीच्या निर्णयाची मुभा संस्थेला असावी.- अरुण देसाई, अध्यक्ष बसवेश्वर पतसंस्था, तेरणी.प्राधिकरणाच्या निवडणूक नियंत्रणास संस्थांचा विरोध नाही; परंतु अन्यायी निवडणूक निधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामुळे संस्था मोडकळीस येण्याची शक्यता असल्यानेच त्यास विरोध आहे. यासंदर्भात सहकारमंत्र्यांकडे व गरज भासल्यास न्यायालयाकडे दाद मागितली जाईल.- सईदअहमद खलिफा, अध्यक्ष, गडहिंग्लज तालुका पतसंस्था फेडरेशन.