शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 15:50 IST

Crimenews kolhapur collector - पाचगाव (ता. करवीर) येथील घरासमोर वहिवाटीसाठी रस्ता मिळत नाही, या कारणात्सव यशवंत गणपती भालकर यांनी मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. त्यांच्यासह मारुती भालकर, उमाजी भालकर अशा तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न तिघांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : पाचगाव (ता. करवीर) येथील घरासमोर वहिवाटीसाठी रस्ता मिळत नाही, या कारणात्सव यशवंत गणपती भालकर यांनी मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. त्यांच्यासह मारुती भालकर, उमाजी भालकर अशा तिघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत माहिती अशी की, यशवंत भालकर यांनी आपल्या घरासमोर वहिवाटीसाठी रस्ता मिळावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याच्या कारणास्तव त्यांनी प्रजासत्ताकदिनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यामुळे येथे अग्निशमन दलाची गाडी, रुग्णवाहिका व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.सकाळी सव्वानऊच्या सुमारास भालकर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले व त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे उपस्थितांची धावपळ उडाली. पोलीस व अग्निशमन दलाच्या दस्तगीर मुल्ला, महेश पाटील, रज्जाक मुलाणी, रमेश जाधव, विशाल चौगुले, प्रतीक ठमके यांनी हा प्रकार रोखला. पुढील प्रतिबंधात्मक कारवाईसाठी त्यांना शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दुपारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारी