महापालिकेला आणखी एक उपायुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:25 IST2021-01-20T04:25:44+5:302021-01-20T04:25:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून शिल्पा दरेकर यांची नियुक्ती झाली आहे. सायंकाळी त्यांनी येथील कार्यभार स्वीकारला. ...

Another Deputy Commissioner to the Municipal Corporation | महापालिकेला आणखी एक उपायुक्त

महापालिकेला आणखी एक उपायुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून शिल्पा दरेकर यांची नियुक्ती झाली आहे. सायंकाळी त्यांनी येथील कार्यभार स्वीकारला. दरेकर या सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

महापालिकेत दोन उपायुक्त पदे मंजूर असून ती रिक्त होती. त्यामुळे आठ महिन्यांपूर्वी निखिल मोरे यांची प्रशिक्षणार्थी उपायुक्त म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी रविकांत आडसूळ यांची नेमणूक झाली, मंगळवारी शिल्पा दरेकर यांची नेमणूक झाली. या दोघांच्या नेमणुका प्रतिनियुक्तीवर झालेल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच वर्षांनंतर महापालिकेला पूर्णवेळ दोन उपायुक्त मिळाले.

आरोग्य अधिकारी व जल अभियंता अशा दोन अधिकाऱ्यांची मागणीही पालिकेने राज्य सरकारकडे केली आहे. हे दोन अधिकारी मिळाले की, महापालिकेचा कारभार अधिक गतीने सुरू राहील.

Web Title: Another Deputy Commissioner to the Municipal Corporation