शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील वृद्धाचा कोरोनाने कोल्हापुरात मृत्यू, आतापर्यंतचे तीनही बळी इतर जिल्ह्यांतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 18:10 IST

२८ जणांना लागण

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या तीनवर गेली असून, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील बेलारी येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात २८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. हे तीनही बळी इतर जिल्ह्यांतील आहेत.

प्लास्टिक कारखान्यातून निवृत्त झालेले हे ज्येष्ठ नागरिक ७ जून रोजी सीपीआरमध्ये दाखल झाले होते. त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले होते. अशातच त्यांचा मृत्यू झाला. १४ मे २०२५ पासून कोल्हापूर जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर २८ जणांना लागण झाली असून, यातील १६ जण कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रातील आहेत. आठ जण ग्रामीण भागातील आहेत तर चार रुग्ण इतर जिल्ह्यांतील असून, यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. १७ जणांची तब्येत बरी झाली असून, त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.

कोरोनाची भीती बाळगण्याची गरज नाही. जुन्या व्याधी आणि प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांना याचा जास्त त्रास होता. ७० टक्क्यांहून अधिक रुग्णांची तब्येत ठीक झाली असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार घ्यावेत. - डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर