शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्वच्छता अभियानाला पुन्हा वेग

By admin | Updated: July 5, 2016 00:27 IST

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान : निकषांत बदल; पुरस्कार बक्षिसांच्या रकमेतही मोठी वाढ

प्रकाश पाटील--कोपार्डे --पाच महिन्यांपूर्वी स्थगित करण्यात आलेले संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुन्हा नव्या जोमाने सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याबाबतच्या सुधारित मार्गदर्शक सूचना जिल्हा परिषदांना दिल्या असून नव्या निकषांप्रमाणे गटाऐवजी थेट तालुका पातळीवर ग्रामपंचायतींची तपासणी होणार आहे. शंभर टक्के हागणदारीमुक्त असणाऱ्या ग्रामपंचायतींना प्राधान्य दिले जाणार आहे. बक्षिसांच्या रकमेतही मोठी वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीचा अभियानात आता सहभाग महत्त्वाचा आहे, असे जिल्हा परिषदांना निर्देश देण्यात आले आहेत.ग्रामीण स्वच्छता हा मूळ उद्देश घेऊन २००१ पासून राज्यात तत्कालीन ग्रामविकासमंत्री आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले. तेव्हापासून ग्रामपंचायतींसाठी संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा घेतली जात आहे. २००३ पासून स्वच्छतेशी व ग्राम विकासाशी निगडित भरीव काम करणाऱ्या जिल्हा, तालुका, विभाग व राज्य पातळीवरही बक्षिसे देण्याचा उपक्रम सुरू केला. राज्यातील अनेक गावांनी लोकसहभागातून याला चळवळीचे स्वरूप देऊन लाखो रुपयांची बक्षिसे मिळविली. राज्यातील अनेक तालुके, ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या.महाराष्ट्रातील हा उपक्रम बघून केंद्र सरकारने ‘निर्मल भारत’ हा उपक्रम सुरू केला. त्यातून चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव केला जात असे. अलीकडे केंद्र सरकारने नावात बदल करून ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू केले. मात्र, राज्यात सुरू असलेले ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान’ स्थगित ठेवण्याचा निर्णय घेऊन ६ फेब्रुवारी २०१६ ला सर्व जिल्हा परिषदांना शासनाने कळविले होते. तेव्हापासून या अभियानातील सर्व उपक्रम जिल्हा परिषदेने बंद केले होते. मात्र, शासनाने त्यात मोठा बदल करीत हे अभियान पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन आॅक्टोबरपासून अभियान प्रारंभराज्यात २० हजार ८०० ग्रामपंचायती असून, त्या २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. दरवर्षी २ आॅक्टोबरपासून अभियान औपचारिकरीत्या सुरू होणार असले तरी १ मेपासून याची पूर्वतयारी सुरू असेल. त्यानंतर महिनाभर जनजागृतीचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविले जाणार आहेत. स्थगित केलेले अभियान पुन्हा सुरू केल्याने ग्रामीण भागात स्वच्छतेचे पुन्हा वारे वाहू लागणार आहे.