शिरोळ तालुक्यातील ग्रामसमित्या सक्रिय करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST2021-04-23T04:25:28+5:302021-04-23T04:25:28+5:30

शिरोळ : कोविड रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी तालुकास्तरावर तात्काळ सुविधा निर्माण करावी, तसेच गाव व शहर पातळीवर ग्रामसमित्या सक्रिय ...

Activate Gram Samiti in Shirol taluka | शिरोळ तालुक्यातील ग्रामसमित्या सक्रिय करा

शिरोळ तालुक्यातील ग्रामसमित्या सक्रिय करा

शिरोळ : कोविड रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी तालुकास्तरावर तात्काळ सुविधा निर्माण करावी, तसेच गाव व शहर पातळीवर ग्रामसमित्या सक्रिय कराव्यात, अशी मागणी ‘आंदोलन अंकुश’चे धनाजी चुडमुंगे यांनी तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.

निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात कोविड रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने शहर व गावपातळीवर समित्या पुन्हा कार्यरत करणे आवश्यक आहे. गतवर्षीप्रमाणे कोविड सेंटर सुरू करून त्यावर तालुका पातळीवरुन नियंत्रण होणे गरजेचे बनले आहे. जयसिंगपूर, कुरुंदवाड व शिरोळमधील सर्व कोविड सेंटर सुरू करावेत, खासगी रुग्णालयात कोविडसाठी आरक्षित बेड निर्माण करावेत. खासगी रुग्णालये रुग्णांची लुबाडणूक करू नयेत व खासगी रुग्णालयातील कोविड टेस्टिंग अहवाल शासनाला कळविण्यात यावा, यासाठी शासकीय नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Web Title: Activate Gram Samiti in Shirol taluka