शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

क्षयरुग्णांची माहिती न देणाऱ्या खासगी रुग्णालयांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 18:01 IST

Muncipal Corporation Kolhapur- क्षयरुग्णांची माहिती न देणाऱ्या खासगी रुग्णालयावर महानगरपालिकेमार्फत कारवाई करण्याचा इशारा महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी दिला आहे.

ठळक मुद्देक्षयरुग्णांची माहिती न देणाऱ्या खासगी रुग्णालयांवर होणार कारवाईक्षयरोगमुक्त कोल्हापूर मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन

कोल्हापूर : क्षयरुग्णांची माहिती न देणाऱ्या खासगी रुग्णालयावर महानगरपालिकेमार्फत कारवाई करण्याचा इशारा महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी दिला आहे.केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने प्रसिध्द केलेल्या अधिसूचनेनुसार निदान झालेल्या प्रत्येक क्षयरुग्णाची नोंद शासनाकडे करणे बंधनकारक आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रातील क्षयरोग निदान करणाऱ्या शहरातील सर्व पॅथोलॉजी, मायक्रो बायोलॉजी, प्रयोगशाळा, रेडिओलॉजी, रुग्णालये, डॉक्टर्स, क्षयरोगाची औषधे विकणारे सर्व औषध विक्रेत्यांनी महापालिकेच्या क्षयरोग विभागाकडे संबंधितांची नोंदणी करावी लागणार आहे. नियमित उपचारात प्रतिसाद न देणाऱ्या एम. डी. आर. क्षयरोगाच्या वाढत्या प्रसारास आळा घालण्यासाठी उपाययोजना म्हणून अशा रुग्णांची नोंदणी करणे बंधंनकारक आहे.महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये निदान झालेल्या आणि उपचाराखाली असणाऱ्या सर्वच क्षय रुग्णांची नोंदणी करून क्षयरोगमुक्त कोल्हापूर मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्याधिकारी डॉ. पोळ यांनी केले आहे. संबंधितांची माहिती कळविण्यास टाळाटाळ करणाऱ्या खासगी डॉक्टर, रुग्णालये यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही आरोग्याधिकारी यांनी दिला आहे. जी संस्था नोंदणी करणार नाही, अशा संस्था, व्यक्तींना क्षयरोगाचा प्रसार करण्यास जबाबदार धरण्यात येऊन त्यात दोषी ठरल्यास त्या व्यक्तीला सहा महिने ते दोन वर्षापर्यंत शिक्षा व दंडाची तरतूद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर