शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जरंडेश्वर कारखान्यावरील कारवाई अजित पवार यांना त्रास देण्यासाठीच : मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 19:59 IST

Politics Ajitdada pawar HasanMusrif Kolhapur : केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून राज्यातील सत्तेतील नेत्यांना त्रास देण्याचा एककलमी कार्यक्रम भाजपचा आहे. जरंडेश्वर साखर कारखाना विक्री राज्य बँकेने केली. त्याच्या झालेल्या दोन्ही चौकशीत काहीही निष्पन्न झाले नाही. तरीही ह्यईडीह्णमार्फत चौकशी लावून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्रास देण्याचा प्रयत्न असल्याची टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देजरंडेश्वर कारखान्यावरील कारवाई अजित पवार यांना त्रास देण्यासाठीच : मुश्रीफहायब्रीड ॲन्युटी अंतर्गत लिंगनूर-मुद्दाळतिट्टा रस्त्याच्या कामाची चौकशी करणार

कोल्हापूर : केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून राज्यातील सत्तेतील नेत्यांना त्रास देण्याचा एककलमी कार्यक्रम भाजपचा आहे. जरंडेश्वर साखर कारखाना विक्री राज्य बँकेने केली. त्याच्या झालेल्या दोन्ही चौकशीत काहीही निष्पन्न झाले नाही. तरीही ह्यईडीह्णमार्फत चौकशी लावून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्रास देण्याचा प्रयत्न असल्याची टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.मंत्री मुश्रीफ म्हणाले, भाजपच्या कार्यकारणी बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री अनिल परब यांच्या ह्यसीबीआयह्ण चौकशीचा ठराव केला. एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकारणीत अशा प्रकारचा ठराव करणे, हे महाराष्ट्रातील पहिले उदाहरण आहे. राज्य सहकारी बँकेने रीतसर टेंडर काढून जरंडेश्वर साखर कारखान्याची विक्री केली. बँकेच्या कलम ८८ व निवृत्त न्यायाधीशांनी केलेल्या तपासणीत काहीही निष्पन्न झालेले नाही. राज्यातील मंत्र्याच्या स्वीय सहायकांना अटक करणे, त्यांची चौकशी करणे हे नवीन तंत्र भाजपने काढल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.उद्धव ठाकरे भला माणूसमंत्री असताना आपण हायब्रीड ॲन्युटी अंतर्गत झालेल्या रस्त्यांच्या कामाची चौकशीची मागणी कशी करता? असे विचारले असता, मागील सरकारच्या काळात वृक्षलागवड, दुष्काळ व टँकरमध्ये भ्रष्टाचाऱ्याबाबत अनेक वेळा मंत्रिमंडळ बैठकीत आवाज उठवला. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भला माणूस आहेत. भाजप कसा गैरफायदा घेते, सत्तेसाठी कशी भीती दाखवली जाते, हे आज त्यांना कळले असेल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.पायऱ्यांवर बसावे लागल्याचे फडणवीसांना दु:खज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांचा बोलवता धनी देवेंद्र फडणवीस हेच आहेत. १०५ आमदार असूनही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसावे लागते, याचे दु:ख फडणवीस यांना आहे. पडळकर यांनी भान ठेवून बोलवे, असे मुश्रीफ यांनी सांगितले. 

टॅग्स :PoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफAjit Pawarअजित पवारkolhapurकोल्हापूर